ED Raid in Mumbai : मुंबईत ईडीचं धाडसत्र; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि नेत्यांमधील कराराबाबत कारवाई
ED Raid in Mumbai : मुंबईत ईडीचं छापासत्र, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती.
ED Raid in Mumbai : ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन शिवसेना (Shivsena) आज पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडणार आहे. मात्र त्यापूर्वी ईडीनं सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुंबई आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापासत्र सुरु केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे छापे मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आले आहेत. दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन केंद्र आणि राज्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं मोठी कारवाई सुरु केली आहे. काही नेत्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केलं असल्याचं माहिती. त्यात एनआयए देखील ईडीला या कारवाईसाठी मदत करत असल्याची माहिती सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. या सर्व प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचंही कळतंय.
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. यावेळी ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत करार करणारे काही नेतेमंडळी आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक पोहोचलं आहे. त्याठिकाणी अतिरिक्त फौजफाटा देखील मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केल्याची माहिती मिळत आहे. एनआयए अर्थात, राष्ट्रीय तपास यंत्रणेला 15 दिवसांपूर्वी दाऊद संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. त्या अनुषंगानं तपास करणाऱ्या ईडीच्या पथकानं आज मोर्चा दक्षिण मुंबईकडे वळवला. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ED raids in Mumbai : मुंबईत ईडीचे छापासत्र, शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले...
- शिवसेना कोणता 'बॉम्ब' फोडणार? आज पत्रकार परिषद; भाजप नेत्यांना कोठडीचा रस्ता दाखवण्याचा राऊतांचा इशारा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा