'इको' कारमुळे अँटिलिया स्फोटकं प्रकरण उलगडणार? आतापर्यंत 8 गाड्या जप्त
मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओमधील स्फोटकांची चौकशी करताना मिठी नदीत एनआयएला नंबर प्लेट सापडली होती, ती कार औरंगाबादची आहे.
मुंबई : अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांनी वापरलेल्या 8 हून अधिक कार जप्त केल्या आहेत. या गाड्यांची फॉरेन्सिक तपासणीही केली जात आहे. पण एनआयए एका इको कारच्या शोधत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ही इको कार औरंगाबाद येथून चोरीला गेली होती. चोरीनंतर या गाडीची कोणतीही माहिती नव्हती. मात्र मिठी नदीत शोध घेत असताना एनआयएला एक नंबर प्लेट मिळाली. ही नंबर प्लेट औरंगाबादमध्ये चोरीला गेलेल्या इको कारची होती.
इको कार फेक एन्काऊंटरच्या उद्देशाने चोरली असल्याचा एनआयएला संशय आहे. ती चोरी केल्यानंतर सचिन वाझे ही इको कार वापरत होते. एवढेच नव्हे तर या वाहनाची नंबर प्लेटही बदलण्यात आली होती.
एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2020 रोजी इको कार चोरीला गेली होती आणि त्यानंतर ती वापरली जात होती. सुरुवातीला सचिन वाझे अँटिलिया स्फोटकं प्रकरणाचा तपास करत होते. या इको कारमध्ये दोन लोकांचा एन्काऊंटर करण्याचा कट होता. इको कारमध्ये दोन लोकांच्या एन्काऊंटरनंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरण सोडवण्याचा आणि दोघांचा एन्काऊंटर केल्यानंतर वाहवा मिळवण्याचा कट रचला गेला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोघांचा एन्काऊंटर केला जाणार होता, त्यातील एक जण मुंबई आणि दुसरा दिल्लीचा होता.
मुंबईतील अँटिलियाजवळ स्कॉर्पिओमधील स्फोटक प्रकरणाची चौकशी करताना मिठी नदीत एनआयएला नंबर प्लेट सापडली होती, ती कार औरंगाबादची आहे. एनआयएच्या पथकाला मिठी नदीत कारची नंबर प्लेट सापडली तिचा नंबर MH 20 FP 1539 असल्याचे आढळले. नंबर प्लेट विजय मधुकर नाडे यांच्या मारुती इको कारची होती. त्यांचा पत्ता छत्रपती नगर, हडको NH 12, औरंगाबाद असा आहे. विजय नाडे हे जालना येथील समाज कल्याण विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही इको कार 16 नोव्हेंबर 2020 रोजी उद्धवराव पाटील चौकातून चोरी झाली. याबाबत सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारची चौकशी केली नाही असा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
विनायक शिंदे सचिन वाझेंच्या सांगण्यावरुन बार, पबमधून वसुली करायचा; NIA च्या सूत्रांची माहिती