एक्स्प्लोर

पनवेल जवळ धावत्या ट्रेनमधून दोन कोटींचे ड्रग्स जप्त

पनवेल जवळ धावत्या ट्रेनमधून उतरुन पळून जाताना एका नायजेरियन व्यक्तीला पकडण्यात आले. त्याच्याकडून दोन कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.

मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणल्याचे दावे केले जात असले तरी अजूनही मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची खरेदी आणि विक्री होत असल्याचे समोर येत आहे. कालच मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने दोन कोटींच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन माणसाला रंगेहात पकडले. त्याच्याकडे दोन किलो 300 ग्रॅम इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ होते. या गुन्हेगारास पकडल्याने अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काल दिल्लीहुन अर्नाकुलमला जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये अज्ञात प्रवाशाने अलार्म चैन खेचल्याने ती गाडी तळोजा स्थानकात थांबवण्यात आली. यावेळी स्टेशनवरील आरपीएफ हेड कॉन्स्टेबल के एन शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान शिवाजी पवार यांनी तपासणी केली असता एका नायजेरियन माणसाने ही चैन खेचल्याचे समोर आले. हा माणूस ट्रेन मधून उतरून पळून जात होता. त्यामुळे संशय आल्याने त्याला या दोन्ही जवानांनी ताब्यात घेतले. मात्र, चैन का खेचली? या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नसल्याने त्याला ताब्यात घेऊन दिवा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयात आणले गेले. या ठिकाणी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो पेक्षा जास्त पावडर सदृश्य गोष्ट असलेले पॅकेट आढळले. त्यामुळे आरपीएफ द्वारे मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांना बोलावले गेले. एनसीबीच्या तज्ञ पथकाने या पदार्थाची तपासणी केली असता ते 'अ‍ॅम्फॅटामाइन्स' नावाचे मादक द्रव्य असल्याचे निष्पन्न झाले. या पाकिटाचे वजन दोन किलो 300 ग्रॅम इतके होते. तर या मादक द्रव्याची बाजारातील किंमत दोन कोटींच्या घरात असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

मुंबईत 60 लाखांचा हिरोइन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

पळून जात असताना आरोपी ताब्यात या नायजेरियन माणसाचे नाव सनी ओचा आयके असून तो 41 वर्षांचा आहे. त्याच्याकडे नवी दिल्ली ते पनवेल हे तृतीय वातानुकूलित डब्याचे तिकीट होते. मात्र, पनवेल यायच्या आधीच तो पळून जात होता. या माणसाकडे ड्रग्स असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्याच्यावर नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्ससेस म्हणजेच एनडीपीएस या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. सापडलेले अंमली पदार्थ आरपीएफ ने एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले आहे. आरपीएफच्या के एन शेलार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या शिवाजी पवार या दोन कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या एका कारवाईमुळे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Nashik Crime | नाशिकमध्ये कोरोना सर्वेक्षणासाठी आल्याचं भासवत भामट्यांनी दागिने लुटले

महत्त्वाच्या बातम्या

हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
हा ओलावा, भविष्यात काय होईल सांगता येत नाही, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येताच संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
अन्न व्यवसायिकांनो सावधान! दिवाळीत कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा... तुकाराम मुंढेंचा इशारा, भेसळयुक्त तेलाविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचा उल्लेख 
FDA News : एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
एफडीएच्या आणखी 6 अधिकाऱ्यांचं निलंबन होणार? मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, कार्यक्षेत्राबाहेर रेड मारणं भोवणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे
तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Share Market: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 308 अंकांनी वधारला पण गुंतवणूकदारांचं 4 लाख कोटींचं नुकसान
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
Maharashtra MLC Election : शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
शांत राहा, महायुतीतील वाद वाढवू नका; विधानपरिषद निकालांनंतर एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
Supreme Court: 'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
'ब्रेकअपनंतर परस्पर संमतीने झालेले संबंध म्हणजे बलात्कार नव्हे' प्रत्येक तुटलेल्या नात्याला बलात्काराचे प्रकरण करणं चुकीचा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Narendra Modi :  अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
अखेरच्या श्वासापर्यंत भारताच्या लोकांची सेवा करत राहणार, नरेंद्र मोदींचा मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर पलटवार
Embed widget