मुंबई : ड्रीम इलेव्हनचा सह-संस्थापक आणि सीओ असलेल्या हर्ष जैन याची पत्नी रचना जैन यांनी साऊथ मुंबईतील पेडर रोडवर एक लक्झरी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे. प्रति स्क्वेअर फूटमागे एक लाख रुपयांहून अधिक किंमत असलेल्या या फ्लॅटची किंमत तब्बल 72 कोटी रुपये इतकी आहे. हा फ्लॅट खरेदी करताना 2.88 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आहे. 


रचना जैन यांनी खरेदी केलेली हा डुप्लेक्स फ्लॅट 29 व्या आणि 30 व्या फ्लोअरवर आहे. रचना जैन यांनी हा फ्लॅट जिवेश डेव्हलपर्स अॅन्ड प्रॉपर्टीज या कंपनीकडून खरेदी केली आहे. या कंपनीचा मालक समीर भोजवाणी हे आहेत. गेल्या काही महिन्यामध्ये या प्रोजेक्टमधील अनेक लक्झरीअस फ्लॅट्स विकले गेल्याने हा प्रोजेक्ट चांगलाच चर्चेत आला आहे. 


याच महिन्यात मोतीलाल ओसवाल फॅमेली ट्रस्टने याच प्रोजेक्टमधील 13 व्या आणि 17 व्या फ्लोअरवरील 6800 स्क्वेअर फूट जागा असलेले दोन फ्लॅट्स खरेदी केले होते. या दोन्ही फ्लॅट्सची किंमत ही तब्बल 101 कोटी रुपये इतकी आहे. त्या आधी इनाम असेट्स मॅनेजमेन्ट कंपनीचे मालक असलेले जितेन जोशी यांनींही या प्रोजेक्टमधील दोन लक्झरी डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केले होते. त्याची किंमत ही 61 कोटी रुपये इतकी होती. 


मुंबई हे देशातील सर्वात मोठी प्रॉपर्टी मार्केट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांनी या ठिकाणी नवीन प्रॉपर्टी खरेदी केल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राची पुन्हा एकदा चांगलीच भरभराट होताना दिसत आहे. या वर्षभरात प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी 1 लाखाहून जास्त रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. ही संख्या गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठी असल्याने रिअर इस्टेट क्षेत्रात उत्साहाचं वातावरण आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :