मुंबई : सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील राज्यांमधल्या प्रदूषणाचा मुद्दा देशभर गाजतोय. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलंय. नवी दिल्लीतील लोकांचा वायू प्रदूषणाने श्वास रोखून धरल्यानंतर मुंबईतील नागरिक देखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आता समोर आलं आहे. मात्र सोमवारी दक्षिण मुंबईतली हवा दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित होती. समुद्रावरुन वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाहनांमुळं वाढलेलं प्रदूषण या सगळ्यांचा विपरित परिणाम दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. सोमवारी दक्षिण मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक पाहायला मिळाला.


सोमवारी कुलाबा परिसरातील हवा दिल्लीच्या संपूर्ण हवेच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचं नोंदवण्यात आलं आहे. दिल्लीतील संपूर्ण शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 331 नोंदवण्यात आला होता. तर मुंबईतील कुलाबा परिसरातील एक्यूआय ३४५ नोंदवण्यात आला आहे. जो दिल्लीच्या पटीत काही जास्तआहे. तेव्हा मुंबईची दिल्ली होऊ नये याची जबाबदारी मुंबईकरांना घ्यायची आहे.


आज सकाळी देखील कालसारखीच परिस्थिती बघायला मिळाली. ज्यात कुलाबा, मलबार परिसरावर धुक्यांची चादर पसरलेली बघायला मिळाली. काल मुंबईतील कुलाबा, माझगाव, बीकेसी, मालाड आणि अंधेरी परिसरातील हवेची स्थिती खालावली होती. सोबतच पुढील 2-3 दिवस ही स्थिती जैसे थे राहण्याची शक्यता आहे. हिवाळयात प्रामुख्याने वाऱ्यांची दिशा जमीनीकडून समुद्राकडे असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. सोबतच वाहनांमुळे होणारं प्रदूषण, बांधकामात झालेली वाढ ह्यामुळे धुलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. त्यामुळे वातावरणातील हवा प्रदूषित होते. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजारअसलेल्यांच्या श्वासाच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त केलं जातंय. 


आज देखील मुंबईतील अनेक भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार आहे. मुंबईतील एकूण एक्यूआय हा आज 280पर्यंत पोहोचला आहे. तर कुलाब्यातील एक्यूआय 370 पर्यंत गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हेवी व्यायाम करणं टाळावं, सोबतच सकाळी आणि संध्याकाळनंतर घराबाहेर पडणं देखील टाळायला हवं. काम करताना श्वासाचा त्रास जाणवल्यास काम थांबवा जेणेकरुन श्वास घेताना अधिक त्रास होणार नाही. एन-95 मास्कचा वापर करा, जॉगिंग टाळा आणि व्यायाम करताना अधिक ब्रेक घ्या. 


मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी बघायला मिळते आहे. मागील 5 वर्षात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दुप्पट वाढ झाली आहे. दुसरीकडे लॉकडाऊननंतर कंपन्या सुरु झाल्याने देखील प्रदूषण वाढले. अशातच हिवाळयात कमी तापमानामुळे, आर्द्रतेत वाढझाल्याने आणि वाऱ्यांचा वेग कमी असल्याने प्रदूषण वाढीस पोषक असं वातावरण तयार होतं आणि यामुळेच मुंबईची देखील दिल्लीतहोत आहे का असं सध्याचं चित्र आहे. 



सोमवारी मुंबईतील एअर क्वॉलिटी इन्डेक्स कसा होता?


मुंबईची दिल्ली होत आहे! 


शहर                    एक्यूआय             एक्यूआय दर्जा 


मुंबई (एकूण)           245                          वाईट 
कुलाबा                   345                      अत्यंत वाईट 
माझगाव                 325                      अत्यंत वाईट 
बीकेसी                   315                      अत्यंत वाईट 
मालाड                   306                      अत्यंत वाईट 
अंधेरी                     259                         वाईट 
चेंबूर                      149                         मध्यम 
बोरीवली                 149                         मध्यम 
नवी मुंबई                130                         मध्यम 
वरळी                     115                         मध्यम 
भांडूप                     111                         मध्यम 


संबंधीत बातम्या


Air Pollution : श्वास रोखून धरा, मुंबईच्या हवेत जीवघेणे सूक्ष्मकण सोडण्याचे वाहतूक क्षेत्राचे प्रमाण 5 वर्षात दुप्पट


Mumbai Air Pollution | मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात कशामुळे आलं? प्रदूषणाचा कशा प्रकारे आरोग्यावर परिणाम होतोय? स्पेशल रिपोर्ट