एक्स्प्लोर
Dr.Payal Death Case | पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनही आरोपींना अखेर बेड्या
या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघींनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
![Dr.Payal Death Case | पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनही आरोपींना अखेर बेड्या Dr.Payal Death Case , three accuse doctor arrested by Mumbai police Dr.Payal Death Case | पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तीनही आरोपींना अखेर बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/26104913/payal-talvi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीन आरोपींना अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल अशी या आरोपींची नावं आहेत. डॉ भक्ती मेहेरला मंगळवारी दुपारी सेशन कोर्टच्या बाहेरून अटक केली होती तर डॉ हेमा आहुजाला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली तर तिसरी आरोपी डॉ. अंकिता खंडेलवालला देखील पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तिघींनाही आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. या वरिष्ठ डॉक्टर पायलचा सतत मानसिक छळ करत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून पायलने 22 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली.
डॉ. हेमा आहुजाला रात्री अटक करण्यासाठी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेण्यात आली होती. आता या तीनही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी तिनही आरोंपीविरोधात अँटी रॅगिंग अॅक्ट आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी सखोल आणि कडक तपास करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना दिले आहे. तसेच आठ दिवसांच्या आत तपासाचा अहवाल सादर करण्याचा आदेशही दिला आहे.
पायलची आत्महत्या नसून तिची हत्या : आई-वडील
पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पायलच्या आई-वडिलांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. दरम्यान, पायलच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरांना अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याचे महाजनांनी सांगितले. तसेच युनिट हेडला निलंबित केल्याचे महाजन यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
रॅगिंगला कंटाळून वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉ. पायल तडवी या तरुणीने बुधवारी आत्महत्या केली. मयत तरूणी ही आदिवासी तडवी समाजाची होती.
तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीकरिता विविध संघटनांच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. तसेच या प्रकरणी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केला जात असून आरोपांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
डॉ.पायल नायर रुग्णालय मंबईमध्ये शिक्षण घेत होती. 1 मे 2018 रोजी तीला मागासर्गीय राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. यानंतर रुग्णालयात सीनिअर असलेल्या डॉ. हेमा आहूजा, डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी सतत तिचा छळ केला. तिने मागासवर्गीय आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून तिला जातीवाचक टोचून बोलत होते. याबाबत तरुणीने वारंवार डीनकडे तक्रार देखील केली होती. पण तरीसुद्धा त्याची योग्य दखल घेण्यात आली नाही. पायलच्या आईने देखील या घटनेआधी नायर रुग्णालयाच्या डीनला पत्र लिहून याबाबत कळविले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)