एक्स्प्लोर

मुंबईतील मॉलमध्ये स्तनपानासाठी महिलांना जागा द्यावी : डॉ. भारती बावधने

मुंबई : मुंबईसारख्या शहरात मॉलमध्ये आपल्या बाळांना घेऊन जाणाऱ्या महिलांना स्तनपानासाठी एक खोली किंवा जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी केली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी मुंबई महापालिका याबाबत आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुंबईसारख्या शहरात देखील जिथे नोकरीवर जाणाऱ्या महिलांची किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असताना स्तनपनासाठी जागा नसल्याची  बाब समोर आली आहे. मुंबईतील मॉलमध्ये स्तनपानासाठी महिलांना जागा द्यावी : डॉ. भारती बावधने डॉ. भारती बावधने, माजी शिवसेना नगरसेविका ऑस्ट्रेलियन सिनेटर लॅरी वॉटर्स यांनी नुकतंच तिथल्या संसदेत आपल्या दोन महिन्यांच्या मुलीला स्तनपान देत कामकाजात सहभाग घेतला. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आणि सर्व थरातून त्यांच कौतुक झालं. आज प्रगत देशात या गोष्टीचं कौतुक होत असताना मुंबईसारख्या आंतराष्ट्रीय शहरात महिलांना सार्वजनिकरित्या स्तनपान देणं कठीण जातं. अगदी मुंबईसारख्या शहरात मॉलमध्ये देखील स्तनपानासाठी वेगळी सोय नसल्याची बाब समोर आली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका डॉ. भारती बावधने यांनी मुंबईतल्या एका मॉलमध्ये स्तनपान देणाऱ्या, पण अवघडल्या अवस्थेत असलेल्या महिलेला पाहिलं आणि मुंबई महापालिका आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिलं. महाराष्ट्रात एसटी महामंडळाने स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष तयार केले. पण मुंबईत मॉलसारख्या ठिकाणी अशी सुविधा नाहीत. महिलांना आडोसे शोधावे लागतात किंवा शौचालयात आडोस्याला जावं लागतं. स्तनपान ही बाळाची आणि आईची अत्यंत महत्वाची गरज आहे. वेळेत स्तनपान न दिल्यास फक्त बाळाची गैरसोय होत नाही तर आईच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात, असं असताना मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्तनपानासाठी एका वेगळ्या खोलीची जागेची गरज आहे. एकीकडे सार्वजनिकरित्या स्तनपान करण्यासाठी जगात चळवळ उभी राहत असताना भारतात या साध्या गरजेसाठी सरकार किंवा महापालिका प्रशासनाकडे जाण्याची वेळ आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget