Dr. Babasaheb Ambedkar 64th Death Anniversary : सर्वांनाच चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करता येणार; मुंबईतील अनुयायांसाठी महापौरांचे आवाहन
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : मागील वर्षी कोरोना महासाथीमुळे नागरिकांना चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता आले नव्हते.
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महिपरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मात्र, या दरम्यान कोविड प्रोटोकॉलचे पालन व्हावे असे आवाहन करताना त्यांनी मुंबईतील अनुयायांनी ऑनलाइन दर्शन घ्यावे अशी विनंतीही महापौरांनी केली. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता चैत्यभूमीवरील व्यवस्थेबाबत महापौरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांनाच अभिवादन करता येणार आहे. मात्र, कोरोना महासाथीच्या आजाराचा धोका लक्षात मुंबई आणि जवळपासच्या नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहनही महापौरांनी केले. मुंबई आणि जवळपास नागरिकांना चैत्यभूमीवर कधीही येता येईल. मात्र, बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांना अभिवादन करण्यासाठी प्राधान्य द्यावे असे महापौरांनी म्हटले.
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहनही महापौरांनी केले आहे. ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिवादन करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. किटकनाशक फवारणीदेखील करण्यात येणार असून अप्रिय घटना घडल्यास नागरिकांच्या सुरक्षितेसाठी अग्निशमन दल, अतिदक्षता रुग्णवाहिका, लाइफ गार्डस तैनात करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
ओमीक्रॉन व्हेरिएंटमुळे मुंबई सतर्क, आढावा घेण्यासाठी अचानक एअरपोर्टवर पोहचल्या महापौर किशोरी पेडणेकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha