एक्स्प्लोर
दादरमध्ये पत्नीची चाकू भोसकून हत्या, डॉक्टर पतीला अटक

मुंबई: दादरमधील शिवाजी पार्कच्या कोहिनूर टॉवर्समध्ये डॉक्टर पतीनं पत्नीची चाकूनं भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हत्येनंतर आरोपी डॉक्टरनं स्वत: पोलीस कंट्रोल रुमला खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. 40 वर्षीय डॉक्टर उमेश बोबले आणि त्यांची 38 वर्षीय डॉक्टर पत्नी तनुजा यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. उमेश हा दंतचिकित्सक (डेंटिस्ट) असून त्याचं जोगेश्वरीत क्लिनिक आहे. दरम्यान, दोघांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्जही केला होता. रविवारी सकाळी घरी असताना दोघांमध्ये पुन्हा वाद सुरु झाला. अखेर रागाच्या भरात डॉक्टर उमेशनं पत्नीवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. पत्नीवर चाकूनं हल्ला केल्यानंतर उमेशनं स्वत: पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी तनुजाला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांनी उमेशवर खुनाचा गुन्हा दाखल केलं. सध्या तो पोलीस कोठीडत आहे.
Before You Go
Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल






















