Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल (गुरूवारी, ता २२) पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपकडून षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला आहे. ही ऑडिओ क्लिप जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली त्यानंतर आता शिवसेनेसह राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे, अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत सवाल उपस्थित करत ही क्लिप आली कुठून? शोधा तुम्ही अशी मागणी देखील केली आहे.(Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip)
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती, बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडीओ क्लिपवरील प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, तो प्रश्न ५०० कोटींचा नाहीये, प्रश्ना असा आहे की कशा प्रकारचं प्लॅनिंग चालतं आणि या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला पण धरलंय. कळलं का? मग कोण रिपोर्ट छापू शकतं आणि कोण रिपोर्ट छापू शकत नाही आणि छापलं नाही तर आम्ही काय करू, त्याच्यामध्ये ही पत्रकारांना पण दिलेली एक धमकी आहे. मला असं वाटतं, याचंही भान तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. प्रिंट असेल किंवा चॅनलमध्ये असं बोलले नसतील ते, पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे, प्रिंट आहे का चॅनल, हा विषय नाही, पण प्रश्न त्यातला गंभीर असा आहे की कशाप्रकारचे नरेटिव्ह पसरवले जाते, कशाप्रकारचं हे प्लॅनिंग करतायत, कशाप्रकारे एका माणसाला बदनाम करतायत, असंही राज ठाकरे म्हणाले.(Raj Thackeray on Manoj Jarange Audio Clip)




















