एक्स्प्लोर

कोकणात नाणार प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही : राज ठाकरे

रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.

मुंबई : नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं आहे. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला. जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणावरुनही त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. ''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही'' ''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,'' अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं जाहीर आव्हान राज ठाकरेंनी दिलं. ''मुख्यमंत्री खोटं कुणासाठी आणि का बोलतात?'' ''मुख्यमंत्री म्हणाले राज्यात एक लाख 20 हजार विहिरी बांधल्या आहेत. इथे राज्यात पाणी नाही आणि विहिरी कुठे बांधल्या? महाराष्ट्रातील 44.9 जमिनीचं वाळवंटीकरण होणार आहे, असा ‘इस्रो’चा रिपोर्ट आहे. मराठवाड्यात तर 1200 फूट खोल गेलं तरी पाणी मिळत नाही आणि तरी मुख्यमंत्री सांगतात की एक लाख 20 हजार विहिरी बांधल्यात. का आणि कशासाठी खोटं बोलताय?'' असा सवाल राज ठाकरेंनी केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची मिमिक्रीही राज ठाकरेंनी करुन दाखवली. यामुळे जोरदार हशा पिकला. ''भाजप बलात्काऱ्यांना पाठीशी घालतोय'' जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरणावरुन राज ठाकरेंनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवाय भाजप बलात्काऱ्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याला तिथल्या तिथे ठेचून मारायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले. ''उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना शिवसेना नगरसेवकाने हाकललं'' ''उस्मानाबादचे मराठी शेतकरी मुंबईत भाजीपाला विकायला आले होते. शिवसेनेच्या नगरसेवकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली आणि त्यांना हाकलून दिलं, हीच तत्परता परप्रांतियांविरोधात का दाखवली जात नाही,'' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवरही निशाणा साधला. भाषणाचा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget