एक्स्प्लोर

'फास्टॅग' घेतला नसेल तर काळजी करू नका, ही बातमी वाचा

आजपासून देशभरात फास्टॅगची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही बऱ्याच वाहनचालकांनी फास्टॅग घेतलेला नाही. त्यांना दिलासा देणारी बातमी आहे.

मुंबई : 'वन नेशन वन टॅग' ही संकल्पना देशभर राबवण्यासाठी आज(15 डिसेंबर)सकाळी 8 वाजेपासून फास्टॅगची अंमलबजावणी देशभर करण्यात आली आहे. मात्र, तुम्ही अजुनपर्यंत फास्टॅग घेतला नसेल तर काळजी करु नका. कारण, फास्टॅग घेण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 जानेवारीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर एक चतुर्थांश फास्टॅग लेन हायब्रीड लेनच्या रुपात काम करणार आहे. हायब्रीड लेनमध्ये कॅशमध्येही टॅक्स घेतला जाणार आहे. फास्टॅगला 1 डिसेंबरलाच देशात अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, लोकांना येणाऱ्या अडचणी पाहून केंद्र सरकारने 15 डिसेंबरपर्यंत याची मुदत वाढवली होती. जास्तीत जास्त लोकांनी या कालावधीत फास्टॅग खरेदी करुन आपल्या वाहनांवर लावण्यासाठी ही मुदत वाढवल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया या अगोदरच फास्टॅगच्या नवीन सुविधेसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. आता प्रत्येक टोल प्लाझावर प्रत्येक लेनमध्ये फास्टॅगद्वारे टोल घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एक लेन हायब्रीड ठेवली आहे, जेणेकरुन मोठ्या आकाराची वाहने त्यातून मार्गक्रमण करतील. एनएचएआयकडून प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केल्यामुळे देशाला वार्षिक 12 कोटी रुपयांची बचत होणार आहे. यामध्ये इंधन आणि कामाच्या वेळचाही समावेश करण्यात आला आहे. सोबतच कोणत्याही टोल प्लाझावर फास्टॅग स्कॅनर खराब असेल तर त्याला वाहन चालक जबाबदार असणार नाही. डिजीटल व्यवहार वाढवण्यासाठी आणि लांबच लांब रांगातून वाहनचालकांची सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. फास्टॅग म्हणजे काय? फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी - RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. रोखीने व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होणार आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांच्या सगळ्या लेन्स या फास्टॅग लेन्स करण्याचं ठरवलंय. इतर प्रकारांनी टोल भरायचा असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूची प्रत्येकी एक लेन राखीव ठेवली जाईल. या लेनला 'हायब्रिड लेन' असं म्हटलं जाईल. फास्टॅगमुळे होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे यामुळे टोलनाक्यांवरची गर्दी कमी होईल. FASTAG | राष्ट्रीय महामार्गावर आजपासून फास्टॅग अनिवार्य, फास्टॅगसाठी वेगळी मार्गिका असणार | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget