Diwali 2022 : दादरमध्ये दिवाळीनिमित्त झुंबर कंदीलांचं विशेष आकर्षण; ग्राहकांची विविध वस्तू खरेदीसाठी लगबग
Diwali 2022 : दादरमध्ये अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये विविध डिझाईन, विविध रंगांची तोरणं पाहायला मिळतायत.
Diwali 2022 : दिवाळीचा (Diwali 2022) सण आजपासून सुरु झाला आहे. या निमित्त मुंबईच्या बाजारात ठिकठिकाणी ग्राहकांची विविध वस्तूंसाठी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय. घराला लावण्यासाठी तोरण ,कंदील फ्लोर रांगोळी अशा विविध प्रकारची खरेदी मार्केटमध्ये केली जात आहे. दादरमध्ये अगदी परवडणाऱ्या किंमतीमध्ये विविध डिझाईन, विविध रंगांची तोरणं पाहायला मिळतायत. याशिवाय बाजारात झुंबर कंदीलचा नवीन प्रकार पाहायला मिळतोय ज्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
ग्राहकांची विविध वस्तू खरेदीसाठी लगबग
दिवाळीचा आजचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. दिवाळीची चाहूल लागताच ग्राहकांची विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात लगबग पाहायला मिळते. त्यातच यावर्षीची दिवाळी ही अधिक खास असणार आहे. याचं कारण म्हणजे तब्बल दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर यावर्षी सगळ्यांनाच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करायला मिळतेय. त्यामुळे नागरिकांचा हा उत्साह आपल्याला बाजारपेठेतही पाहायला मिळतो.
झुंबर कंदीलांचं विशेष आकर्षण
बाजारात नागरिकांचा उत्साह असला तरी विक्रेते देखील ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वस्तू बाजारपेठेत घेऊन आले आहेत. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये देखील अगदी 250 ते 300 रूपयांच्या किंमतीत आकर्षक तोरणांच्या डिझाईन्स तसेच रांगोळीच्या आकर्षक डिझाईन्स पाहायला मिळाल्या. यामध्ये विशेष बाब म्हणजे यावर्षी बाजारात झुंबर कंदील ही एक अनोखी संकल्पना पाहायला मिळाली. या कंदीलांना देखील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. आणखी महत्त्वाचं म्हणजे अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांसाठी हे कंदील उपलब्ध आहेत. या कंदीलांची किंमत 250 रूपयांपासून सुरु होते. ते 500 पर्यंत हे झुंबर कंदील उपलब्ध आहेत.
पाहा व्हिडीओ :
महत्वाच्या बातम्या :