एक्स्प्लोर

Dharavi Redevelopment Project : धारावीकरांना 350 चौरस फूट जागा मिळणार, अदानींचा शब्द

Dharavi Redevelopment Project : धारावीतील पात्र निवासी सदनिका धारकांना 17 टक्के अतिरिक्त म्हणजे 350 चौरस फूट जागा मिळणार असल्याचं अदानींकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबई : धारावीमधील (Dharavi) पात्र रहिवाशांना स्वतंत्र स्वयंपाकघर आणि शौचालये असलेले किमान 350 चौरस फूट आकाराचे सदनिका  मिळणार आहेत, अशी घोषणा अदानी  समूह (Aadani Group) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) या  विशेष हेतू कंपनीने आज केली.  धारावीतील घराचे हे क्षेत्रफळ मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 17 टक्के अधिक आहे.

“सर्व धारावीकरांसाठी नवीन सदनिका या स्वप्नातील घरे असतील आणि त्यांचे राहणीमान उंचावतील. धारावीकरांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब प्रत्येक घरात दिसेल. सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनांमध्ये ते नेहमीच दिसत असते. धारावी पुनर्वसन प्रकल्पात धारावीचा आत्मा अबाधित राखून ही स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रा. लि. च्या (डीआरपीपीएल)ने सांगितले.

धारावीची संस्कृती जपून विकास करणार

पात्र निवासी सदनिका म्हणजे 1 जानेवारी 2000 च्या आधी अस्तित्वात असलेल्या सदनिका आहेत. प्रत्येक फ्लॅटमध्ये स्वतंत्र स्वयंपाकघर आणि स्वतंत्र शौचालय असेल आणि हे फ्लॅट्स सुरक्षित असण्यासोबतच त्यात चांगला उजेड असेल. ते हवेशीर आणि आरोग्यदायी असतील. धारावीची चैतन्यमय आणि वेगळी उद्योजकीय संस्कृती अबाधित ठेवून धारावीचा व्यावसायिक आणि औद्योगिक परिसर म्हणून विकास करण्याचा आणि जागतिक स्तरावर जोडलेले शहर बनवण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे.

धारावीकरांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक संधी, भविष्य घडविणारे शिक्षण तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, आधुनिक आरोग्य सुविधा आणि दर्जेदार जीवनशैली हे सारे धारावी आणि नवी धारावी येथे उपलब्ध असेल. त्यांच्यासाठी सामाजिक सभागृहे, मनोरंजन क्षेत्र, सार्वजनिक उद्याने, दवाखाने आणि मुलांसाठी संगोपन केंद्रे देखील असतील.

अपात्र निवासी सदस्यांना देखील घरं मिळणार

धारावीतील अपात्र निवासी सदनिका धारकांना महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार प्रस्तावित, परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येईल. यासाठी, मोठ्या संख्येने झोपड्यांमध्ये असलेल्या रहिवाशांच्या अनेक गरजा लक्षात घेऊन नव धारावीमध्ये, धारावीसारखा विकास करण्यात येईल. डीआरपीपीएलने धारावीचा कायापालट करण्याचे आव्हान स्वीकारले असून या बहुप्रतिक्षित परिवर्तन प्रकल्पासाठी सर्व हिस्सेधारकांकडून मिळणारा पाठिंबा आमच्यासाठी बहुमूल्य आहे. त्यातून सिंगापूर आणि इतर प्रगत राष्ट्रांमध्ये अशा योजनांसाठी ज्या प्रक्रिया पाळल्या जातात त्यांचे सर्वोत्तम पद्धतीने असे पालन करण्यात येईल की, उर्वरित जगासाठी झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरी पुनरुज्जीवनाचे नवे मानदंड निश्चित होतील.

डीआरपीपीएल नक्की काय?

धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) ही अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून स्थापन केलेली एक विशेष उद्देश कंपनी आहे. धारावीकरांना आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्या अंगभूत उद्योजकतेची भावना जपतानाच त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचे डीआरपीपीएलचे उद्दिष्ट आहे. मनुष्य केंद्रीभूत ठेवून केले जाणारे हे परिवर्तन मोकळ्या जागेची पुनर्बांधणी आणि नव्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेले सामुदायिक राहणीमान, वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक बाबींवर आधारित आहे आणि स्वच्छ वातावरण असलेल्या तेथील परिपूर्ण नागरी सुविधा दर्जाचा मानदंड उभा करतील.

हेही वाचा : 

Dharavi Redevelopment Project : धारावी होणार सिंगापूर! पुनर्विकासासाठी अदानी समूहाचा नेमका प्लान काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9  AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Vidhan Sabha Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची अंतिम टक्केवारी, लोकसभेपेक्षा टक्का वाढला, कोणाला फायदा अन् कोणाला फटका?
राज्यात मतदानाचा टक्का वाढला; विधानसभेची अंतिम टक्केवारी समोर, कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतं?
Embed widget