एक्स्प्लोर

..तर, कोणताच उद्योजक कंपनी सुरू करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या आणि उद्योगांना चालना देण्यासाठी प्रकिया सुलभ करा, या दोन विषयांसंदर्भात विधानसेभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पत्रांतून विनंती केली आहे.

मुंबई : प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अद्यापही वैधानिक विकास मंडळांची आवश्यकता असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना एकूण दोन पत्रे आज त्यांनी लिहिली. पहिले पत्र हे वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीची विनंती करणारे आहे, तर दुसरे पत्र लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योगांना सूट देताना आवश्यक प्रक्रियांचे सुलभीकरण करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबाबत आहे.

पहिल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात, की प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत येत्या 30 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यात या मंडळांची भूमिका आणि मदत अतिशय महत्त्वाची राहिली आहे. अद्यापही प्रादेशिक असमतोल दूर करण्यात 100 टक्के यश आपण गाठू शकलेलो नाही. त्यामुळे नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित घ्यावा.

विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही : उदय सामंत  उद्योगांच्या संदर्भातील जाचक अटी मागे घ्या

दुसरे पत्र हे लॉकडाऊनच्या काळात उद्योग पुन्हा सुरू होण्यात येत असलेल्या अडचणींसंदर्भात आहे. या पत्रात ते म्हणतात की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे बंद असलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान व्हावी आणि लोकांच्या हाताला काम मिळावे, यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनच्या कालखंडात काही बाबतीत सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील 17 एप्रिलला काही निर्णय घेतले. त्यात कोणत्या बाबींना सूट देण्यात आली, तेही सांगितले आहे. विशेषत: उद्योगांच्या संदर्भात जी काही सूट देण्यात आली, ते करताना त्यामध्ये अनेक जाचक अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या जाचक अटींची पूर्तता करणे उद्योगांना याकाळात अशक्य झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय : शिक्षण मंत्री उदय सामंत

परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी उद्योगांना विविध प्रकारच्या परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे. या परवानगी प्राप्त करण्यात सुद्धा अनंत अडचणींचा मुकाबला उद्योगांना करावा लागतो आहे. याशिवाय, उद्योगांच्या कामगारांमध्ये कुणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास उद्योजकावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात सुद्धा काही संभ्रम निर्माण झाले असल्याने तर उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे कुणीही उद्योग सुरू करण्याकरिता तयार नाही. त्यासोबत विविध उद्योग घटकांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. छोटे उद्योग सुरू झाल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकत नाही. त्यामुळे परवानगींच्या प्रक्रियेत सुलभता आणणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. या सर्व परवानगींची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्या सर्व एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणाव्यात आणि डिजिटल पद्धतीनेच त्या दिल्या जाव्यात.

आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊनही एखादा कामावरचा कामगार हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर त्याची जबाबदारी पूर्णपणे उद्योजकांवर किंवा व्यवसायिकावर टाकण्यात येणार नाही किंवा यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, याबाबतचा संभ्रम दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या संकटातून बाहेर येत असताना अर्थव्यवस्था योग्य प्रकारे संचालित करणे आवश्यक आहे. असे झाले तरच आपण या संकटाचा भविष्यातही मुकाबला करू शकू. यासाठी तत्काळ निर्णय आपल्याकडून घेतले जावेत, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

MPSC Exam Update | एमपीएससीची परीक्षा तात्पुरती स्थगित, परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढण्याबाबत चर्चा होणार

 

महत्त्वाच्या बातम्या

Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget