एक्स्प्लोर
Advertisement
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री
हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्नितांडव झालेल्या कमला मिल कम्पाऊंड परिसराला आज भेट दिली.
"ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अजॉय मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉटेल मालकांवर कारवाई होणारच", असं मुख्यमंत्री म्हणाले.
याशिवाय ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, अशा 5 बीएमसी अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर जाणीवपूर्वक परवाने दिले असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबईत काही संशयित बांधकामं आहेत, त्याचं ऑडिट करण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. तसंच जे विनापरवाना हॉटेल्स वगैरे चालत असेल, तर ते पाडून टाकलं पाहिजे, असंही सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
5 अधिकाऱ्यांवर कारवाई कमला मिल अग्नितांडवात 14 बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. पालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. कमला मिलच्या परवानग्यांशी संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई - जी साऊथ वॉर्ड ऑफिसर सपकाळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर अन्य पाच इंजिनिअर्स आणि अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. निलंबित अधिकारी5officials have been already suspended but beyond that if they or owners are found responsible for loss of lives,they will be booked under IPC.Guilty won’t be spared. Ordered for safety audit of all such structures immediately&demolish illegal ones:CM @Dev_Fadnavis at #KamlaMills pic.twitter.com/T5mG8aK4ZW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 29, 2017
- मधुकर शेलार पदनिर्देशित अधिकारी
- धनराज शिंदे ज्युनिअर इंजिनियर
- महाले सब इंजिनिअर
- पडगिरे - वैद्यकीय आरोग्य अधिकारी
- एस. एस. शिंदे -अग्निशमन अधिकारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement