एक्स्प्लोर

Deven Bharti Mumbai Police Commissioner: देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख; आता मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड, कोण आहेत देवेन भारती?

Deven Bharti Mumbai Police Commissioner: देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

Deven Bharti Mumbai Police Commissioner: देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा (Deven Bharti Mumbai Police Commissione) कार्यभार सोपवण्यात आला आहे. 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर (Vivek Phansalkar) आज मुंबई पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. 

कोण आहेत देवेन भारती? (Who is Deven Bharti?)

भारती मूळचे  बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक केले आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईत डीसीपी, झोन 9 आणि डीसीपी गुन्हे शाखा म्हणून काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते. तेव्हा ते सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले. मग 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात IPS अधिकार्‍यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं होतं. देवेन भारती यांनी मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपास केला आहे. महाविकास आघाडी सरकारने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्य सुरक्षा महामंडळात अतिरिक्त महासंचालक म्हणून बदली करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय-

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आलं. मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं होतं. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते.

संबंधित बातमी:

Deven Bharati : देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; विवेक फणसळकर मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Chhatrapati Sambhajinagar : गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
गाड्या अडवल्या; अंगावर पेट्रोल ओतलं, आई बहिणीवरून शिव्या दिल्या.. तिकीट कापल्याने भाजप कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला, संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान
Pune traffic Update: थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; महात्मा गांधी, फर्ग्युसन, जंगली महाराज रस्ता बंद, या पर्यायी मार्गांचा करा वापर
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार
Pune Mahanagarpalika Election 2026: 15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
15 जागांची यादी पाहून भाजपने विषयच सोडला, पुण्यात शिवसेना-भाजपची युती कशी तुटली, वाचा इनसाईड स्टोरी
Mahanagarpalika Election 2026 BJP: मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
मोठी बातमी: समोरच्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला अन् भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला, मतदानापूर्वीच कमळ गुलालाने न्हाऊन निघालं
BJP Candidate : भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
भाजपच्या दिग्गज नगरसेवकांना धक्का, तरुण कार्यकर्त्यांना संधी; पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांचं तिकीट कापलं, नागपुरात 11 तरुण नवे चेहरे
BMC Election 2026: वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
वंचितने काँग्रेसकडून 63 जागा मागितल्या, पण 16 जागांवर उमेदवारी अर्ज भरलेच नाहीत, समोर आलं मोठं कारण
Embed widget