एक्स्प्लोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन

कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत

मुंबई : कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार आहे, असा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एबीपी माझाच्या व्हिजन पुढच्या दशकाचं या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एबीपी माझा'ने प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेती, कर्जमाफी, मुंबई-नागपूर हायवे, युती सरकार तसंच दिल्लीला जाण्यासंदर्भातील वृत्तासह अनेक विषयांवर भाष्य केलं. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक गरजेची शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू आहे. शाश्वत शेतीसाठी पाम्याचं नियोजन आवश्यक असं सांगत गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवायला हवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कर्जमाफीमुळे विकासकामं थांबणार नाही कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण विकासकामं थांबणार नाहीत. त्यासाठी वेगळा प्लॅन तयार आहे. कर्जमाफीनंतरही शेती क्षेत्रातील गुंतवणुकीचा ट्रेण्ड थांबणार नाही, हे माझ्यासमोरील आव्हान आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शेतकऱ्यांसाठी कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान नाही मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला अनेक शेतकरी विरोध करत आहेत. परंतु समृद्धी महामार्गाचं काम लवकरच सुरु होईल. या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांना आजवरची सर्वाधिक नुकसानभरपाई देत आहोत, हे मी दाव्याने सांगत आहे. मुंबई-नागपूर हायवेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा, संवाद करुनच जमीन अधिग्रहित करणार आहोत, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसंच मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचा फायदाच होईल, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी सत्तेत भागीदार असूनही वारंवार भाजपला वेठीस धरणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझा व्हिजन’मध्ये कठोर शब्दात ठणकावलं आहे. राज्यातील भाजपचं सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ काम करत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याचवेळी हा अदृश्य ‘हात’ म्हणजे ‘पंजा’ (काँग्रेसचा) नाही. अशी कोपरखळीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मारली. ‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यानी शिवसेनेला सुनावलं. दिल्लीत जाण्याचा सध्यातरी प्लॅन नाही व्यंकय्या नायडूंची उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची दारं उघडणारी ठरु शकते. अशी जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरु आहे. याचबाबत मुख्यमंत्र्यांना छेडण्यात आलं. 'अशी चर्चा कुठे सुरु असते मला माहित नाही. बहुधा ही चर्चा मला तुमच्या माध्यमातूनच समजते. पण सध्या तरी माझा दिल्लीला जाण्याचा कोणताही प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही तसा प्लॅन ऐकीवात नाही.’ असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं व्हिजन तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख होणार : मुख्यमंत्री सर्वात जास्त मनुष्यबळाचा आपला देश : मुख्यमंत्री शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी : मुख्यमंत्री शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन आवश्यक : मुख्यमंत्री राज्यात 80 टक्के जमीन कोरडवाहू : मुख्यमंत्री गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवायला हवा : मुख्यमंत्री शेतीला सेवाक्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री शेती आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्योग क्षेत्रात दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक : मुख्यमंत्री कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार, पण विकासकामं थांबणार नाही, त्यासाठी वेगळा प्लॅन तयार : मुख्यमंत्री कर्जमाफीनंतरही शेती क्षेत्रातील गुंतवणुकीचा ट्रेण्ड थांबणार नाही, हे माझ्यासमोरील आव्हान : मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी कोणाशीही चर्चा करण्यासाठी तयार : मुख्यमंत्री मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम लवकरच सुरु होईल : मुख्यमंत्री आजवरची सर्वाधिक भरपाई समृद्धी प्रकल्पग्रस्तांना देण्यात येईल : मुख्यमंत्री या प्रकल्पात आम्ही शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसानभरपाई देत आहोत, हे मी दाव्याने सांगतो : मुख्यमंत्री मुंबई-नागपूर हायवेसाठी शेतकऱ्यांशी चर्चा, संवाद करुनच जमीन अधिग्रहित करणार : मुख्यमंत्री मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांना फायदा : मुख्यमंत्री मुंबई-नागपूर समृद्धी हायवेमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचा फायदाच : मुख्यमंत्री सध्यातरी दिल्लीला जाणारा माझा प्लॅन नाही किंवा पक्षाचाही कोणताही प्लॅन ऐकीवात नाही : मुख्यमंत्री झोटिंग समितीतील शिफारसी इथे सांगितल्या तर माझ्यावर हक्कभंग येईल : मुख्यमंत्री 145चं गणित मला हे मीडियाच्या माध्यामातूनच समजलं : मुख्यमंत्री शिवसेना आणि भाजप पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू : मुख्यमंत्री भाजप आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होतात. पण 5 वर्ष आमचं सरकार टिकणार आहे : मुख्यमंत्री ह्या सरकारला कुठलाही धोका नाही, कोणताही भूकंप होणार नाही : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Embed widget