एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांच्या वैद्यकीय कक्षाच्या मदतीचा चढता आलेख; 8 महिन्यात 12 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत 

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधि व न्याय विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली आहे.

Devendra Fadnavis मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील विशेष वैद्यकीय कक्षाने  रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या आयुष्यात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.  गोरगरीब – गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. यानुसार कक्षाने सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या 8 महिन्यात एकूण 12 कोटी 73 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. 

जानेवारी, 2024 पासून ते ऑगस्ट 2024 पर्यंत कक्षाच्या माध्यमातून 323 रुग्णांना मदत झाली आहे. ह्रदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण, मुत्रपिंड प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, फुफुसाचे आजार, अस्थिरोग अवयव पुनर्रस्थापना शस्त्रक्रीया (Replacement Surgeries), यासारख्या गंभीर व सर्व सामन्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या आजारांच्या शस्त्रक्रीयेंचा समावेश आहे. गोर-गरीब रुग्णांनी धर्मादाय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री मदत ‍कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. 

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार मिळण्याकरिता उच्च न्यायालय, मुंबई यांनी योजना तयार केली आहे. त्यानुसार, प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व  10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या धर्मादाय रूग्णालयांना बंधनकारक आहे.  या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबाजावणी होत नसल्याने गोर-गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले होते.  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी विधि व न्याय विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर या योजनेची प्रभावी व पारदर्शी अंमलबजावणी करण्याबाबत पाऊले उचलली आहे. त्याचाच भाग म्हणून शासनाच्या 31.10.1023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात धर्मादाय अंतर्गत सुमारे 468 रुग्णालये नोंदणीकृत असून त्यामधील सुमारे 12 हजार बेड्स निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांकरीता उपलब्ध आहेत. यामध्ये कोकीळाबेन, मुंबई, एन.एन रिलायन्स, मुंबई, सह्याद्री हॉस्पीटल, पुणे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालय, पुणे इत्यादी नामांकीत रुग्णालयांचा समावेश असून सर्वधर्मादाय योजनेची अधिक प्रभावी अंमलबाजवणी कशी करता येईल यासाठी कक्षामार्फत मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर येथे विभागीय कार्यशाळेचे आयोजन देखील करण्यात आले होते. या मध्ये राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी उत्साहाने सहभाग घेतला.

निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना या सवलतीच्या खाटा पारदर्शकपणे उपलब्ध होण्याकरीता राज्यस्तरीय विशेष मदत कक्षासाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्याचे काम प्रगतीपथावर असून लकरच सदर प्रणाली सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना अर्ज करणे आणखी सोपे होणार असून योजनेची पारदर्शी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात. त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान ठरली आहे. सद्यस्थितीत कक्षाचे कामकाज ऑफलाईन पध्दतीने सरु असुन निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मदती मिळणे राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षास अर्जासह कागदपत्रे charityhelp.dcmo @maharashtra.gov.in या ईमेल आयडी वर मेल करु शकतात किंवा प्रत्यक्ष कक्षात आणून देवू शकतात. धर्मादाय रूग्णालयातील बेड मिळण्याकरिता रूग्णास त्याचा, नातेवाईकांचा अर्ज, लोकप्रतिनीधींचे पत्र, आधार कार्ड  / ओळखपत्र,  रेशनकार्ड / तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन आवश्यक आहे. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यरत योजनेचा लाभ घेण्याकरीता निर्धन व दुर्बल रूग्णांनी लाभ घेण्यात यावा, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full Segment : मविआ ते महायुती, जागावाटप ते मुख्यमंत्रि‍पद, रस्सीखेच सुरुच?Zero Hour Jammu Kashmir : जम्मू - काश्मीरमध्ये 370 वरुन घमासान, मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल!Zero Hour Bachchu Kadu Parivartan : बच्चू कडू यांचं 'परिवर्तन'! शिंदेंची साथ सोडत तिसऱ्या आघाडीत!Zero Hour Amit Thackeray : Balasaheb Thackeray यांचा आणखी एक नातू निवडणुकीच्या रिंगणात?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
Embed widget