मुंबई : दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनीही आता चांगलीच खबरदारी घेतलीय. कारण बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत नऊ मार्च 2020 पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आलीय. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करता येणार नाही. समारंभ किंवा काही कार्यक्रमांना मात्र यामधून सूट देण्यात आलीय. तसंच चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि शासकीय कार्यालयांनाही यातून वगळण्यात आलंय.


सीएए समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या वादातून दिल्लीत हिंसाचाराला सुरुवात झाली. सलग तीन दिवस हा हिंसाचार सुरुच होता. आता दिल्ली हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. या हिंसाचारात आतापर्यंत मृतांची संख्या 42 वर पोहोचली आहे. काल शुक्रवारी राजधानीत तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली. हिंसाग्रस्त भागातील स्थिती सुधारत असून जीवनावश्यक वस्तूही मिळत आहेत. परिसरात सात हजार सशस्त्र पोलीस व निमलष्करी जवान तैनात आहेत. परिस्थितीत सुधारणा झाल्याने जमावबंदी आज शिथिल करण्यात आलीय.

Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

दिल्लीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी -
सीएए विरोधावरुन दिल्लीप्रमाणे मुंबईतही आंदोलने सुरू आहेत. शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईतील भिवंडीतही महिलांचं शांततापूर्ण आंदोलन सरुय. तर, दुसरीकडे सीएए समर्थानासाठीही लोक आता रस्त्यावर उतरत आहेत. परिणामी इथंही दिल्लीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत नऊ मार्चपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त यांनी बृहन्मुंबई हद्दीत जमावबंदीचा आदेश जारी केलाय.

Delhi Violence : हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना, 48 एफआयआर दाखल

दिल्ली हिंसाचाराच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना -
दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे. या प्रकरणांच्या चौकशीसाठी दोन विशेष तपास पथकांची(एसआयटी)स्थापन केली आहेत. पोलीस ठाण्यात 100 पेक्षा अधिक एफआयआर दाखल झाल्या आहेत. पथकांचे नेतृत्व पोलीस उपायुक्त जॉय टिर्की आणि राजेश देव करणार आहेत. या पथकांमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचे चार अधिकारी असणार आहेत. या तपासावर अतिरिक्त पोलिस आयुक्त बी.के. सिंह लक्ष ठेवणार आहे. दिल्ली हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 42 झाली असून त्यातील 11 जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे.

Delhi Violence | सर्वाधिक हिंसाचार झालेल्या करावलनगरमधून ग्राऊंड रिपोर्ट