नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या दंगलीचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला आहे आणि या प्रकरणांच्या चौकशीसाठी दोन विशेष तपास पथकांची (एसआयटी) स्थापन केली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 48 एफआयआर दाखल झाल्या आहेत. पथकांचे नेतृत्व पोलिस उपायुक्त जॉय टिर्की आणि राजेश देव करणार आहेत. या पथकांमध्ये सहाय्यक पोलिस आयुक्त पदाच्या चार अधिकारी असणार आहेत आणि या तपासणीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त बी.के. सिंह लक्ष ठेवणार आहे. दिल्ली हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 38 झाली आहे. त्यातील 11 जणांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला आहे.
परिस्थिती नियंत्रणात आहे : दिल्ली पोलीस
दरम्यान, दिल्ली पोलिस पीआरओ एमएस रंधावा यांनी परिस्थिती सामान्य असल्याचे सांगितले. आज कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही. पुरेसे सैन्य तैनात केले आहे. 48 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. 350 अमन समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पुढे म्हणाले की आम्ही सर्व प्रकरणांची चौकशी करत असून तपास सुरू आहे. आमच्याकडे बरेच फुटेज आहेत. तपासात जशी प्रगती होईल तशी माहिती आम्ही देऊ, असे ते म्हणाले.
Delhi Violence | दिल्ली हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू, सोनिया गांधी आज राष्ट्रपतींना भेटणार
आपचा सदस्य आढळल्यास त्यावर दुप्पट कारवाई करा : अरविंद केजरीवाल
दिल्ली हिंसाचार प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.', असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे. तसंच या प्रकरणात जर आम आदमी पक्षाचा एखादा सदस्य दोषी आढळल्यास त्याला दुप्पट शिक्षा करा. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर कोणतेही राजकारण होऊ नये, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
बारावीची परीक्षा रद्द
सीबीएसईने ईशान्य दिल्ली आणि हिंसा प्रभावित असलेल्या भागातील 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी होणारी परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या 69 आणि दहावीच्या 86 केंद्रांवरील परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सीबीएसईने 28 व 29 तारखेला या विषयांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दिल्लीतील उर्वरित भागात सीबीएसई परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.
कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने राष्ट्रपतींची भेट
दिल्ली हिंसाचाराबद्दल कॉंग्रेस पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी या वेळी केली. या शिष्ठमंडळात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, अहमद पटेल, एके एंटनी, गुलाब नबी आझाद, मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला या वेळी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
दिल्ली हिंसाचारप्रकरणी काँग्रेसचं राष्ट्रपतींना निवेदन; राजधर्माचं पालन झालं नसल्याचा गंभीर आरोप
Delhi Riots | दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुनावणी करणाऱ्या हायकोर्टातील न्यायाधीशांची तडकाफडकी बदली