एक्स्प्लोर

राम कदमांच्या दहीहंडी उत्सवावर समन्वय समितीचा बहिष्कार

पुढच्या वर्षीपासून समन्वय समितीचे गोविंदा पथक आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार नाहीत. आधीच बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेले राम कदम यांची दहीहंडी सुद्धा आता अडचणीत आली आहे.

मुंबई : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप आमदार राम कदम यांचा दहीहंडी उत्सवही आता अडचणीत आला आहे. कारण थर रचलेल्या पथकाला खाली उतरण्यास सांगितल्याने नाराजी व्यक्त करत, दहीहंडी समन्वय समितीने राम कदमांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीपासून समन्वय समितीचे गोविंदा पथक आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार नाहीत. आधीच बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेले राम कदम यांची दहीहंडी सुद्धा आता अडचणीत आली आहे. नेमकं काय प्रकरण आहे? अभिनेत्री प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदम या महाशयांनी हंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थरावर पोहचलेल्या गोविंदांना पुन्हा खाली उतरवलं. मुंबईतील घाटकोपरमध्ये राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात हा प्रकार घडला. मालिका आणि चित्रपटांतून गाजलेली अभिनेत्री प्राची देसाईने राम कदमांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली होती. प्राचीला एखादा संवाद म्हणण्याची फर्माईश यावेळी करण्यात आली. तिने माईक हातात घेतला आणि तुम्हाला बघून मला 'बोलबच्चन' चित्रपटातला एक डायलॉग आठवला, असं म्हणत डायलॉग म्हणायला सुरुवात केली. व्यासपीठावर डायलॉगबाजी आणि आगत-स्वागत सुरु असतानाच एक गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत होतं. योगायोगाने प्राचीने डायलॉग म्हणायला सुरुवात केली, त्याचवेळी त्या पथकाने जवळपास आठ थर रचत दहीहंडीपर्यंत मजल मारली होती. खरं तर, इतक्या मेहनतीने गोविंदा आठव्या थरावर पोहचले असताना प्राची देसाईला डायलॉग थांबवण्याची विनंती करणं सहज शक्य आणि व्यवहार्य होतं. किंबहुना ते अपेक्षित असताना राम कदमांनी उंचीवर गेलेल्या गोविंदांना थांबवलं. 'ए थांब थांब थांब.. फोडायची नाही. थांब. नितीन. त्याला खाली उतरव. खाली उतरव. फोडायची नाही. थांब, थांब, खाली उतरव. खाली उतरव. ए नितीन. मी सांगेन योग्य वेळेस. दोन मिनिटं थांब. खाली उतरा सगळे.' अशी दमबाजी राम कदमांनी करताच बिचारे गोविंदा निमूटपणे खाली उतरले. राम कदमांचा हा वायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली आहेत. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget