India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
India Alliance Petition Against ECI: निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि एसआयआर प्रक्रियेला आव्हान देत काल इंडिया आघाडीनं नवी दिल्लीत मोठा निषेध मोर्चा काढला.

India Alliance Petition Against ECI: निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेला आव्हान देत काल (12 ऑक्टोबर) इंडिया आघाडीनं (India Alliance) नवी दिल्लीत मोठा निषेध मोर्चा काढला आणि सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल केली. मोर्चाचं नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर प्रमुख नेत्यांनी केलं.
सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यामुळं इंडिया आघाडीनं भव्य मोर्चा काढून सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका केली. यात एकूण 11 याचिकाकर्ते आहेत. याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्तांसह उर्वरित दोन आयुक्तांनाही प्रतिवादी करण्यात आलं. याचिकाकर्त्यांमध्ये राहुल गांधींसह, खरगे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, संजय राऊत, सुप्रिया सुळे, यांचाही समावेश आहे. या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे निर्देश सरन्यायाधीशंनी दिलेत. याचिकेत त्रुटी असल्याने आज सुनावणी होण्याची शक्यता नाही. (India Alliance Petition Against ECI)
इंडिया आघाडीच्या याचिकेत त्रुटी- (Error In India Alliance Petition)
- याचिकाकर्त्यांच्या नावांमध्ये चुका
- खाजगी व्यक्तींना पक्षकार बनवण्याचे कारण अस्पष्ट
- जुन्या निर्णयांच्या प्रती याचिकेसोबत नाहीत
- नऊ याचिकाकर्त्यांनी वकालतनामाच दिला नाही
- मल्लिकार्जुन खरगेंच्या ओळखपत्राची प्रत अस्पष्ट
- याचिकेसोबतच्या कोर्ट फीमध्ये 220 रुपये कमी
- जोडलेले अनेक दस्त ऐवज धुसर, अस्पष्ट
- अखिलेश यादव आणि तेजस्वी यांच्यासह 9 नेत्यांच्या वकालतनाम्यांवर अद्याप स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत.
सर्वोच्च न्यायालयात विरोधी पक्षाची याचिका, आक्षेप काय?
- एसआयआर (SIR) लागू करण्याची पद्धत चुकीची आहे.
- एसआयआर सुरू करण्यासंबंधीची कागदपत्रे सार्वजनिक करावीत
- मतदार डेटाबेसचे स्वतंत्र लेखापरीक्षण
- सुनावणी होईपर्यंत एसआयआरला स्थगिती द्यावी
- फॉर्म-6 मधील बदलांसंबंधी प्रश्न
- केंद्रीय निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेतले
- मतदार यादीतून नावे वगळण्यापूर्वी सूचना आणि सुनावणी आवश्यक
- वगळलेल्या मतदारांची यादी द्यावी
- ईव्हीएमचे पुनरावलोकन करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी
इंडिया आघाडीची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी सूचीबद्ध केलेली नाही- (India Alliance Morcha Marathi News)
सदर त्रुटींमुळे, इंडिया आघाडीची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी सूचीबद्ध केलेली नाही. रजिस्ट्रीने याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित एकूण 14 आक्षेप नोंदवले आहेत. आपल्या याचिकेत इंडिया आघाडीने SIR शी संबंधित निवडणूक आयोगाच्या निर्णयांचा संपूर्ण रेकॉर्ड कोर्टासमोर सादर करण्याची मागणी केली आहे. त्यात 24 जून 2025 रोजी SIR लाँच करण्याच्या निर्णयाशी संबंधित फायली, बैठकीचा अजेंडा, कार्यवाहीचा तपशील आणि निवडणूक आयुक्तांनी दाखल केलेल्या हरकतींचाही समावेश आहे.
निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका, VIDEO:
संबंधित बातमी-






















