एक्स्प्लोर

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून 63 गोविंदा जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

ठाणे शहरात दहीहंडी दरम्यान गोविंदा अपघात होऊन 8 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील काही रुग्णांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे.  

मुंबई :  मुंबईत दहीहंडी उत्सवाचा (Dahihandi 2024) उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा (Govinda) जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी 6  वाजेपर्यंत 63  गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली. यापैकी 8 गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 32 जणांवर ओपीडीमध्ये  उपचार सुरू आहेत. तर, 23 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. ही आकडेवारी मुंबई महापालिकेने दिली असून रात्री 6  वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, ठाण्यात संध्याकाळी 5 पर्यंत  गोविंदा जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. चाळीतील गल्लींपासून ते राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या लाखोंच्या कार्यक्रमात गोविंदांचा उत्साह ओसंडून वाहत होता. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी 9 थर रचण्यात आले आहे. संध्याकाळी  7.30 वाजेपर्यंत कोणत्याही गोविंदा पथकाला 10 थर लावता आले नाही. ठाण्यात 'जय जवान' गोविंदा पथकाने प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.

कोणत्या रुग्णालयात किती जखमींवर उपचार सुरू?

मुंबई शहर: 

केईएम रुग्णालय : 8 दुखापत (1 दाखल, 7 उपचाराधीन)
लोकमान्य टिळक, सायन रुग्णालय : 07 जखमी (उपचाराधीन)
नायर रुग्णालय: 5 जखमी (उपचाराधीन)
जे जे रुग्णालय : 1 जखमी (डिस्चार्ज)
सेंट जॉर्ज रुग्णालय : 03 जखमी (1 दाखल, 1 उपचाराधीन,1 डिस्चार्ज)
जीटी रुग्णालय : 1 जखमी (डिस्चार्ज)
पोद्दार हॉस्पिटल : 6 जखमी (6 डिस्चार्ज)
लिलावती रुग्णालय-  1  (उपचाराधीन) 

पूर्व उपनगर :

राजावाडी रुग्णालय : 3 जखमी (2 अॅडमिट, 1 डिस्चार्ज)
एमटी अग्रवाल हॉस्पिटल : 1 (अॅडमीट)
वीर सावरकर रुग्णालय : 1 ( डिस्चार्ज )
शतब्दी रुग्णालय : 6  (डिस्चार्ज)

पश्चिम उपनगर : 

वांद्रे भाभा रुग्णालय : 3 जखमी (1 दाखल, 2 डिस्चार्ज)
व्ही एन देसाई रुग्णालय : 4 जखमी (डिस्चार्ज)
कूपर हॉस्पिटल : 6 जखमी (२ दाखल, 4 डिस्चार्ज)
भगवती रुग्णालय- शून्य
ट्रॉमा केअर हॉस्पिटल- 4 जखमी (डिस्चार्ज)
BDBA रुग्णालय- 9 जखमी (1 दाखल, 8 डिस्चार्ज)
एस के पाटील रुग्णालय- शून्य
नानावटी रुग्णालय- शून्य

ठाण्यात 8 जखमी गोविंदा 

ठाणे शहरात दहीहंडी दरम्यान गोविंदा अपघात होऊन 8 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील काही रुग्णांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहे.   तर, गोविंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोणताही गोविंदा गंभीर जखमी झाला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget