एक्स्प्लोर

Dadar Kabutarkhana : कबुतरखान्यावरुन वाद पेटवून समाजाचं भलं होणार? जैन मुनी निलेशचंद्र यांना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का?

Jain Muni Nilesh Chandra : जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी आता कबुतरांसाठी थेट आंदोलनाची हाक दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवला जातोय का असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.

मुंबई : कबुतरावरुन समाजकारण, धर्मकारण आणि राजकारण एवढं ढवळून निघेल असं कोणी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास बसला नसता. पण निवडणुकीचा हंगाम असला की अशा सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवावाच लागतो. शांतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जैन समाजाचे मुनी (Jain Muni Nilesh Chandra) पुन्हा सक्रिय झाले आहेत आणि त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना मनसे तेवढंच तिखट उत्तर देत आहे. फक्त आपापल्या धर्मापुरता विचार करणाऱ्या या लोकांना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का? असा प्रश्न आता पडतोय.

प्रत्येक बिल्डींगमध्ये जाऊन प्राणीमात्रांसाठी जनजागृती करणार, आप बटोंगे तो पिटोगें, भाषेवरून मारहाण किती योग्य? आम्ही जैन सनातनी आहोत, प्रत्येक वॉर्डात कबुतर रक्षक तयार करणार.... जैन मुनी निलेशचंद्र यांची ही वक्तव्य. हे राजकीय नेते नाहीत तर हे जैन समाजातील साधू आहे. मात्र आता त्यांच्या तोंडी आंदोलनाची, राजकारणाची भाषा रुळू लागल्याचं दिसतंय. कबुतरखान्यावरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय होऊ लागला आहे. मराठी भाषेचा सन्मान, धर्माची निष्ठा अशा गोष्टी आता निलेशचंद्र महाराज बोलू लागले आहेत.

Jain Muni Nilesh Chandra : कट्टर सनातनी असल्याचा जैनमुनींचा दावा

तुमच्यापेक्षा  महाराष्ट्राचा जास्त सन्मान हा राजस्थानी समाज करतो. तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान आहे तर मग भेंडी बाजारात जा. मी कट्टर सनातनी आहे, मला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे असं जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले. आता मुंबईतल्या प्रत्येक टॉवरमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला. कबुतरांमुळे कोणतेही आजार होत नाहीत असा दावा त्यांनी पुन्हा एकदा केला आहे.

आजपासून मी प्रत्येक टॉवर मध्ये जाणार आहे. आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत तसे कबूतर रक्षक तयार करत आहोत. जरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते कबतर घेऊन येत असतात असं ते म्हणाले.

कबुतरांचा प्रश्न धर्माशी जोडण्याच्या नादात जैनमुनीना महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोय का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रश्न राज ठाकरे सोडवू शकतात असा विश्वास त्यांनी एबीपी माझाच्या महाकट्ट्यावर बोलून दाखवला होता.

Dadar Kabutarkhana News : समाजात वाद लावण्यासाठी राजकारण

जैनमुनी निलेशचंद्र महाराज यांच्या या वक्तव्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी हल्लाबोल केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर तोतया मुनी वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता पालिकेच्या तोंडावर जाणिवपूर्वक मराठी विरुद्ध मारवाडी वाद पेटवण्यासाठी हा तोतया मुनी वक्तव्य करतो. जैन समाज-मराठी माणस गुण्यागोविंदाने राहतात हे भाजपला पचत नाही म्हणून समाजात वाद निर्माण लावण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत. निलेशचंद्र हे मुनी आहेत. राजकीय वाटचाल करायची असेल तर त्यांनी भाजपाकडून गळ्यात गमच्छा घालन उतरावं, राजकीय भाष्य धार्मिक गुरूच्या गादीवर बसन करू नये असं अखिल चित्रे म्हणाले.

जैन मुनी निलेशचंद्र महाराजांनी आता कबुतरांसाठी थेट आंदोलनाची हाक दिली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद मुद्दाम पेटवला जातोय का असा सवाल मुंबईकर विचारत आहे. मुंबईकरांचे, मग ते जैन असो की हिंदू, हिंदी असो की मराठी... रोजच्या जगण्याचे प्रश्न वेगळे आहेत. कबुतरं, कबुतरखाने यावरून वाद पेटवून खरंच समाजाचं भलं होणार आहे का याचा विचार जैनमुनींसह सर्वांनीच करण्याची गरज आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Mumbai Crime: कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
Embed widget