Dadar Kabutar Khana: दादर कबुतरखान्यासंदर्भात BMC ने काढलं महत्त्वाचं पत्रक, पक्ष्यांचं खाणं बंद करण्यासाठी 'या' पोर्टलवर क्लिक करा
BMC on Kabutar Khana: दादर कबुतरखान्यावरील मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झाला होता. त्यांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून काढली होती.

Dadar Kabutar Khana: दादर येथील कबुतरखान्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वाद पेटला असतानाच आता मुंबई महानगरपालिकेने यासंदर्भात एक पत्रक काढले आहे. कबुतरखान्यातील (Kabutar Khana) पक्ष्यांना नियंत्रित स्वरुपात खाद्य पुरवण्यासंदर्भातील हे पत्रक आहे. या प्रस्तावावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना (Pigeons) नियंत्रित पद्धतीने खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, यासाठी प्राप्त तीन अर्जांबाबत नागरिकांनी सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान हरकती / सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईतील नागरिकांना करण्यात आले आहे.
BMC on Kabutar Khana: मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
मुंबईतील कबुतरखान्यांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला दादर कबुतरखाना ट्रस्ट बोर्ड, यास्मिन भन्साळी अँड कंपनी आणि श्रीमती पल्लवी पाटील, अॅनिमल अँड बर्डस् राईटस् अॅक्टिविस्ट यांच्याकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. हे तिन्ही अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?guest_user-english या लिंकवर अवलोकनासाठी उपलब्ध आहेत.
नागरिकांनी संकेतस्थळावर दिलेल्या या अर्जांचे अवलोकन करुन कबुतरखान्यांच्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच कबुतरांना खाद्य पुरवावे (Control Feeding) किंवा कसे, तसेच यातील अन्य मुद्द्यांबाबत त्यांच्या हरकती / सूचना suggestions@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान पाठवाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच, सदर हरकती / सूचना लेखी स्वरुपात प्रत्यक्ष सादर करावयाच्या असतील तर त्या ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी, तिसरा मजला, एफ दक्षिण विभाग कार्यालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई-४०० ०१२’ येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ते शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीदरम्यान कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
सध्या मुंबई महानगरपालिकेकडून कबुतरांवर खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. कबुतर खाने बंद केल्यानंतर खाद्य टाकणाऱ्यांकडून 1 ऑगस्टपासून ते आतापर्यंत मुंबई महानगर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) 32 हजार रुपये दंड वसूल केला आहे. सर्वात जास्त दंड हा गोरेगाव पश्चिम विभागातून (पालिकेच्या पी एस) 6 हजार रुपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या दादर विभागातून 5 हजार 500 रुपये इतका दंड पालिकेकडून वसुल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























