एक्स्प्लोर
Advertisement
दाभोलकर-पानसरे हत्याकांड : न्यायदानाच्या प्रक्रियेवर परिणाम होतोय, संथ तपासावरून हायकोर्टाची नाराजी कायम
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीवर हायकोर्टानं पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे.अशा विलंबामुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हताही धोक्यात येते,असं कोर्टाने म्हटले आहे.
मुंबई : तपासात होणाऱ्या विलंबामुळे न्यायदानाच्या कामातही विलंब होतोय याचं भान ठेवा. केवळ ताब्यात आलेल्या आरोपींवर लक्ष देऊ नका, जे फरार आरोपी मोकाट आहेत त्यांचं काय? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयानं दाभोळकर-पानसरे हत्याकांड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर वारंवार नाराजी व्यक्त केली. एखाद्या आरोपीला तुम्ही कधीपर्यंत कस्टडीत ठेवणार? जसे पीडित कुटुंबियांचे अधिकार आहेत तसे अटक केलेल्या आरोपींचेही आहेत. त्यामुळे तुमच्या संथ तपासाचा परिणाम न्यायप्रक्रियेवर होत असल्याचे सांगत खटला लवकरात लवकर सुरु होणे गरेजेचे असल्याचे खंडपीठाने नमूद केले.
त्याचबरोबर खटला सुरू झाल्यास त्यातही निश्चितता असणे गरजेचे आहे. कारण, पीडितांच्या कुटुंबियांना न्यायाचा तसेच अटकेत असलेल्या आरोपींच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न देखील महत्वाचा आहेच. अटक केलेले आरोपी त्यांच्या हक्कांबद्दलही प्रश्न उपस्थित करु शकतात. कोणालाही आरोपीला दोषी ठरल्याशिवाय दीर्घकाळ तुरुंगात ठेवता येणार नाही. मात्र अशा विलंबामुळे न्यायव्यवस्थेची विश्वासार्हताही धोक्यात येते. लोकांनी व्यवस्थेवरील पूर्ण विश्वास गमावू नये, असं आम्हाला वाटतं अशी खंतही खंडपीठाने व्यक्त केली. सीबीआय आणि एसआयटीला दोन्ही प्रकरणातील खटला कधी सुरू होणार?, याची माहिती न्यायालयाला कळविण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 24 मार्चपर्यंत तहकूब केली.
दाभोलकर-पानसरे हत्याकांड : तपास यंत्रणेच्या धिम्या कारभारावर हायकोर्टाची नाराजी
डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गुरूवारी तपासयंत्रणांनी आपल्या तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. ज्यात सीबीआयनं कळवलं की दाभोळकर हत्याकांड प्रकरणी वापरलेलं हत्यार खाडी पात्रातून काढण्यासाठी अजून महिन्याभराचा अवधी लागेत. तर पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीनं कळवलंय की ताब्यात असलेल्या इतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी 'सनातन'चे वकील संजीव पुनाळेकरसह दोघांना अटक, सीबीआयची कारवाई
मात्र इतक्या संथपणे अशा संवेदनशील प्रकरणांचा तपास अपेक्षित नाही. कारण या दोन्ही प्रकरणात खास टीम्स कार्यरत आहेत, त्यामुळे कामाचा ताण त्यांच्यावर असणं अपेक्षित नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर इथं फेब्रुवारी 2015 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांवनी ऑगस्ट 2013 साली हत्या करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement