मुंबई : कोरोना महामारी संसर्गाने कधीही न थांबणारी मुंबई अचानक थांबली. अजूनही पूर्वीची धावणारी मुंबई पूर्वपदावर आलेली नाही. दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. गर्दी न करू नका, असं प्रशासन वारंवार सांगत असताना मुंबईत नाईट क्लबमध्ये हजारो विनामास्क लोकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर नाईट क्लबवर मुंबई महापालिकेने धाडी टाकल्या आहेत. यावेळी जर नियम पाळले नाहीत तर रात्र कर्फ्यू लावण्याचा इशारा मुंबई महापालिका आयुक्तांनी दिला आहे.


कोरोना रुग्णसंख्या दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाढत आहे. परिणामी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास प्रशासन वारंवार सांगत आहे. मात्र, काही मुंबईकरांना याचं गांभीर्य आलेलं दिसत नाही. कारण, नाईट क्लबमध्ये लोक विनामास्क गर्दी करताना पाहायला मिळत आहे. अशा नाईट क्लबवर मुंबई महापालिकेने धाडी टाकल्या आहेत. परळमधील ओपीटोम क्लबमध्ये मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.


तर, रात्र कर्फ्यू लावणार : मुंबई महापालिका आयुक्त


जर मुंबईकरांनी नियम पाळले नाहीत तर राज्य शासनाला लेखी विनंती पत्र देऊन मुंबईत रात्र कर्फ्यू लावण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांनी सूचना केली आहे. मात्र, राज्य शासनाकडून रात्र कर्फ्यू लावण्याची कोणतीही तयारी नाही, तशी शासनाची इच्छाही नाही. नाईट क्लबला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत वर्तन सुधारले नाही तर नाईलाजानं कठोर पावलं उचलावी लागतील. ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर महापालिका नाईट क्लबमधील पार्ट्यांविरोघात कडक पावले उचलणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.


संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची तयारी! काय असणार प्राधान्यक्रम?


कोरोना चाचणी टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अजब शक्कल


लसीकरणाच्या मोहिमेत रोजंदार कामगार प्राधान्यक्रमात 


#MumbaiLocal सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल नव्या वर्षातच सुरू होणार,BMCआयुक्त इक्बाल चहल यांची माहिती