मुंबई : अनेक कंपन्यांच्या कोरोना लस अंतिम टप्प्यात असून लवकरचं देशात लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यात कशा प्रकारे लसीकरण होणार? प्राधान्यक्रम काय असणार? या विषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राज्यात रक्तसाठा कमी असल्याने लोकांना रक्तदानासाठी प्रेरीत करण्यासाठी राजेश टोपे यांनी आज रक्तदान केलं. त्यानंतर ते बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 13 ते 20 तारखेपर्यंत स्वाभीमान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या काळात रक्तदान मोहिम राबवली जाणार आहे. आज रक्तदान करून आम्ही इतरांनाही रक्तदान करण्याचे आवाहन करतो. राज्यात 4 ते 5 दिवसांचेच रक्त शिल्लक असल्याची माहिती टोपे यांनी दिली. महाराष्ट्रात सरकारी रूग्णालयात मोफत रक्त देणार, एकही पैसा घेणार नाही. याची अंमलबजावणी 12 डिसेंबरपासून होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.


कोरोना लस प्राधान्यक्रमाने दिली जाणार : टोपे


कोरोना लस पहिल्यांदा आरोग्य सेवकांना, नंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर 50 वर्षांवरील कोमोर्बिड लोकांना दिली जाणार आहे. हे लसीकरणा पूर्ण झाल्यावर सर्व 50 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. 11 कोटींपैकी 3 कोटी लोकांना लस पहिल्या टप्प्यात दिली जाणार आहे. यादी तयार करुन मतदान बूथप्रमाणे लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर 30 मिनिटे तिथं बसवले जाईल. केंद्राकडून आलेली लस वाशी येथील केंद्रात ठेवली जाणार असून तेथून वितरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी 16 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आल्याचंही टोपे म्हणाले.


संबंधित बातम्या :
कोरोना लसीकरणानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग राहणार का?


Corona vaccine | कॅनडाची Pfizer-BioNtech लसीच्या वापराला मंजुरी, लसीकरणासाठी सर्व नियोजन तयार


कोरोना चाचणी टाळण्यासाठी बाहेरुन येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अजब शक्कल 


Corona Vaccine | महाराष्ट्रात प्रत्येकाला कोरोनाची लस कशी मिळणार? थेट रुग्णालयातून ग्राऊंड रिपोर्ट