Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) आज 259 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) चारने वाढली आहे, कारण मंगळवारी 255 नव्या बाधितांची नोंद झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी आजही मुंबईत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 202 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2205 इतका होता.

  


मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 259 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 945 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 259 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 419 बेड्सपैकी केवळ 858 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.03% टक्के इतका झाला आहे.



देशातील सक्रिय रुग्णांमध्ये घट


देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असली तरी एकूण सक्रीय रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 541 रुग्णांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. अशातच काल दिवसभरात 30 हजार 615 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, कालच्या तुलनेत आजच्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात किंचितशी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 3 लाख 32 हजार 918 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन 5 लाख 10 हजार 413 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha