COVID19 : भारतात कोरोना महामारीमध्ये (Corona Virus) झालेल्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर दाखवण्यात आलेल्यापेक्षा जास्त आहे. भारतामधील कोरोनाची (Covid-19) आकडेवारी लपवण्यात आली आहे. असा आरोप काही रिसर्चच्या आधारावर परसारमाध्यमांनी लावला होता. यावरुन केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी स्पष्टीकरण दिले आहे. रिपोर्ट बोगस आणि पूर्णपणे चुकीचे आहेत. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. 


अनेक खासगी अहवालानुसार असा दावा करण्यात आलाय की नोव्हेंबर 2021 पर्यंत देशात 32 लाख ते 37 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण प्रसारमाध्यमांनी केलेला दावा पूर्णपणे चुकीचं असल्याचे सरकारने म्हटले आहे. कोरोनामुळे या कालावधीत 4.6 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सरकारने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.  ‘भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंद ठेवण्याची एक सक्षम व्यवस्था आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा आणि राज्य स्थरापर्यंत सरकारने व्यवस्था केली आहे. याद्वारे नियमीतपणे आकडेवारीची नोंद केली जाते, असे केंद्र सराकरने स्पष्टीकरणात म्हटले आहे. ‘
 
भारतात कोरोनामुळे झालेले मृत्यूची संख्या अधृतिक संख्यापेक्षा सहा ते आठ पटीने जास्त असल्याचा अंदाज नवी दिल्लीच्या सेंटर डी सायन्स ह्यूमेन्स येथील एका संशोधकाने क्रिस्टोफ गुइलमोटोनुसार बांधला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 4 लाख 59 हजार इतकी होती, ती आता पाच लाखांच्या पुढे गेली आहे.   






सक्रिय रुग्णांमध्ये घट, रुग्णसंख्या 3 लाख 32 हजार 918 वर - 
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 30 हजार 757 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 541 रुग्णांचा मृत्यू (Covid Deaths) झाला आहे. अशातच काल दिवसभरात 30 हजार 615 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. म्हणजेच, कालच्या तुलनेत आजच्या दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात किंचितशी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 3 लाख 32 हजार 918 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीत जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन 5 लाख 10 हजार 413 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 19 लाख 10 हजार 984 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.