Aurangabad News : औरंगाबाद पालिकेच्या आयुक्त यांच्या कार्यालयापासून प्रत्येक अधिकारी आणि आरोग्य केंद्रात 'कोरोना भगाव यंत्र' बसवण्यात आले आहे. या मशीनचं नाव आयन डोम, असं असून पालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, ही मशीन हवा शुद्ध करून हवेतील कोरोना विषाणू मारण्याचीही क्षमता यामध्ये आहे.
दरम्यान पालिकेने एक मशीन 6 हजार 499 रुपयांना खरेदी केली आहे. अशा 300 मशीन पालिकेने खरेदी केल्या आहेत, त्यामुळे या मशीन बसवण्यासाठी पालिकेने जवळपास 20 लाख रुपये खर्च केले आहेत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना आता औरंगाबाद पालिकेने हे यंत्र आणल्याने नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
मशीन खरेदीत भ्रष्टाचार?
हे नवं यंत्र नक्की हवा शुद्ध करणार आहेका? तसंच एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना इतके लाखो खर्च करुन ही मशीन बसवण्याची नक्की गरज आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान या इतक्या मोठ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली जात आहे.
मंगळवारी औरंगाबादमध्ये सर्वाधिक ओमायक्रॉनबाधित
राज्यातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत मंगळवारी मोठी वाढ झाली आहे. तब्बल 351 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये औरंगाबाद शहरात सर्वाधिक 148 रुग्ण आढळले आहेत. नव्या 351 रुग्णांमुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 4 हजार 345 वर गेली आहे. या एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 334 रुग्ण बरे झाले आहेत.
हे ही वाचा -
- Maharashtra Corona Update : मंगळवारी राज्यात 2831 नव्या रुग्णाची भर, 8395 जण कोरोनामुक्त
- भेसळखोरांनी हद्द पार केली! सडक्या शेंगदाण्याला पिस्ता म्हणून विकलं; नागपुरात मोठी कारवाई
- 12 वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार Corbevax? DCGI च्या कमिटीने केली शिफारस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha