Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 135 नवे कोरोनाबाधित, तर 233 जण कोरोनामुक्त
Corona Update : मुंबईमध्ये बुधवारी शंभरहून खाली रुग्णसंख्या गेल्यानंतर पुन्हा 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत केवळ 135 नवे रुग्ण आढळले असून 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत (Mumbai) मागील 24 तासांत 135 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी रुग्णसंख्या शंभरहून कमी आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या काहीशी अधिक आढळली आहे. सोमवारी 96 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आज 233 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 135 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 315 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 135 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 248 बेड्सपैकी केवळ 781 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.
मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल होणार?
राज्यभरात कोरोनाचे रुग्ण (Coronavirus) कमी होऊ लागल्याने राज्य पुन्हा एकदा अनलॉकच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. यावर आता लवकरच मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.
हे ही वाचा :
- Maharashtra Unlock : राज्यात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; दोन दिवसात निर्णय
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- Beed Corona Update : दोन महिन्यांनंतर सोमवारी बीड जिल्ह्यात एकही रुग्ण नाहीॉ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha