एक्स्प्लोर

Covid Vaccination : सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर, ओलांडला 2 कोटींचा टप्पा!

सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे

Covid Vaccination : कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण (Covid Vaccination) मोहीम अंतर्गत 2 कोटी डोसेस देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय,महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस तसेच बूस्टर डोस यांचा देखील समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केले आहे.

2 कोटी डोसेस देण्याचा महत्त्वाचा टप्पा मुंबई महानगराने गाठला

मुंबईसह देशभरात 16 जानेवारीला कोविड-19 प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्याटप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर आघाडीवरील (फ्रंटलाईन) कर्मचाऱ्यांसाठी 5 फेब्रुवारी 2021, 60 वर्ष वयावरील तसेच 45 ते 59 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी 1 मार्च 2021, 45 वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी दिनांक 1 एप्रिल 2021, तसेच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी दिनांक 1 मे 2021 पासून लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील नवयुवकांचे देखील लसीकरण सुरु झाले आहे. 

सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर

मुंबई महानगरपालिकेसाठी विविध समाज घटकांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुन विशेष लसीकरण सुरु करण्यात आले. लसीकरण केंद्रांवर जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागू नये. म्हणून 4 मे 2021 पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. स्तनदा मातांसाठी 26 मे 2021 पासून तर विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी / व्यवसायासाठी जाणाऱ्यांसाठी 1 जून 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. शारीरिक व मानसिकरित्या दुर्बल व्यक्तींसाठी दिनांक 26 जून 2021; गर्भवती स्त्रियांसाठी आणि शासकीय ओळखपत्र नसलेल्या नागरिकांसाठी दिनांक 14 जुलै 2021 पासून लसीकरण हाती घेण्यात आले. तर, वैद्यकीय कारणांनी व वयोमानाने अंथरुणास खिळून असलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन दिनांक 2 ऑगस्ट 2021 पासून लसीकरण राबविण्यात येत आहे. यासोबतच, दिव्यांग व्यक्ती, आदिवासी बांधव, कारागृहांमधील बंदिवान, एलजीबीटी समुदायातील नागरिकांसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि 18 वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांसाठी राखीव सत्र अशा निरनिराळ्या उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे. लसीकरणाची व्याप्ती व वेग वाढवल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने सातत्याने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. पहिली आणि दुसरा डोस यांचा एकत्रित विचार करता,

5 मे 2021 रोजी 25 लाख,

26 जून 2021 रोजी 50 लाख,

7 ऑगस्ट 2021 रोजी 75 लाख, 

4 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी डोस देण्याचा टप्पा गाठला .

28 सप्टेंबर 2021 रोजी 1 कोटी 25 लाख,

10 नोव्हेंबर 2021 रोजी 1 कोटी 50 लाख,

29 डिसेंबर 2021 रोजी 1 कोटी 75 लाख लसीकरण पूर्ण झाले.

तर 23 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 2 कोटी कोविड लस डोसचा टप्पा गाठण्यात आला.

यामध्ये 2 कोटी 5 लाख 85 हजार 580 प्रथम डोस, 90 लाख 92 हजार 118 दुसरा डोस तर 3 लाख 29 हजार 478 बूस्टर डोस समाविष्ट आहेत.  

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे आवाहन

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस वेळेत घ्यावेत, विशेषतः दुसरा डोस देय असलेल्यांनी वेळेत डोस घेवून लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगर) सुरेश काकाणी यांनी केले आहे. मुंबई महानगरात वेगाने व अधिकाधिक नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यासाठी राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख यांच्या निर्देशानुसार आणि महापौर किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कळत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget