एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत मुलं पळवणारी टोळी सक्रीय, सीएसटी स्टेशनवरुन चिमुकलीचं अपहरण
मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा मुलं पळवणारी टोळी सक्रीय झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या मेनलाईन हॉलमधून शनिवारी दोन वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण झालं. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वैष्णवी धवसे असं अपहरण झालेल्या चिमुकलीचं नाव आहे.
एक वर्षांची महिला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसह सीएसटी रेल्वे स्टेशनच्या मेनलाईन हॉलमध्ये गाडीची वाट पाहत होती. तिला बुलडाण्याला जायंच होतं. मात्र पहाटे सव्वाचार सुमारास महिलेचा डोळा लागला. हीच संधी साधून एका जोडप्याने वैष्णवी धवसेचं अपहरण केलं.
जाग आल्यावर वैष्णवी जवळ नसल्याचं समजताच तिच्या आईने सीएसटी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. मुलीची माहिती मिळाल्यास सीएसटी रेल्वे पोलिस ठाणे अथवा पोलिस निरीक्षक विलास चौगुले - 9821218190 किंवा एपीआय गोंदके -9870003102 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
टेक-गॅजेट
Advertisement