एक्स्प्लोर

तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करू नका, परप्रांतियांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊन-2 च्या घोषणेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजन करत आहे, याची माहिती उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिली. राज्यातील उद्योगधंदे सुरु करण्याबाबत 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वैद्यकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची माहिती असणाऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन केले होतं, याला जवळपास 21 हजार जणांनी प्रतिसाद दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

परराज्यातील नागरिकांना, मजुरांनाही मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आपुलकीने आवाहन केले आहे. तुम्ही घाबरू नका, आमच्यासोबत राहा. तुम्ही महाराष्ट्रात आहात चिंता करु नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण एकजुटीने कोरोनाच्या संकटाशी सामना करु. आजपासून परराज्यात जाणाऱ्या ट्रेन सुरु होतील, असं या मजुरांना वाटलं होतं. त्यामुळे हे सर्वजण वांद्रे स्टेशनबाहेर जमले होते. राज्य सरकार तुमची काळजी घेतंय. या गोरगरीब जनतेच्या भावनांशी खेळू नका आणि राजकारण करु नका. या संकटाचा कुणी गैरफायदा घेतला तर त्यांना सोडणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.

कोरोनानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी टीम करण्यात आली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या टीमचं नेतृत्व करत आहेत. राज्यातील आर्थिक बाबींचा ही टीम अभ्यास करणार आहे. राज्यातील उद्योगधंदे सुरु करता येतील का याचा अभ्यास सुरु आहे. याबाबत येत्या 20 एप्रिलनंतर निर्णय घेऊ. याशिवाय विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींना एकत्र आणून त्यांना या कोरोनाच्या लढाईत एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आज एकत्र आहेत. मी सर्व नेत्यांशी बोलत आहे. अनेक मौलवींशी बोलत आहे. आज आपण एकजूट दाखवली पाहिजे. या एकजुटीच्या जोरावर आपण हे युद्ध जिंकू, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या : मुंबईत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी; वांद्रे स्टेशनबाहेर परप्रांतीय मजुरांची मोठी गर्दी Coronavirus | भारताच्या शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचलावा : मोदी

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget