मुंबई : मुंबईत करोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असून मुंबईतील सहा संशयितांपैकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं कस्तुरबा हॉस्पिटलच्या मध्यवर्ती प्रयोगशाळेने स्पष्ट केलं आहे. दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील 2 प्रवासी दोन दिवसांपूर्वी करोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू असून या रुग्णांसोबत मुंबईतील 2 सहप्रवासी देखील करोना बाधित असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.


राज्यातील एकूण करोनाची लागण झालेल्यांची संख्या ७ वर


जगभरात मृत्यूतांडव घडवलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसचा पुण्यानंतर मुंबईतही शिरकाव झाला आहे. पुण्याच्या कोरोनाग्रस्त दाम्पत्यासोबतच्या 2 सहप्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कस्तुरबा रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाबाधितांचा आकडा 7 वर पोहोचला आहे.


Coronavirus | महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, राज्य शासनाकडून खबरदारीची उपाययोजना, चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे


भिवंडीतही कोरोनाचा एक संशयित रूग्ण 


भिवंडीतील 60 वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती भिवंडीत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर महिलेमध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून आली.


Coronavirus | भिवंडीत कोरोनाचा संशयित रूग्ण आढळल्याने खळबळ; खबरदारी म्हणून रूग्णालयात दाखल


बीडवरील प्रवाशांवर करडी नजर 


दुबईहून आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरू केलं आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाच्या रूग्णांसोबत प्रवास करणाऱ्या बीडच्या तिघांवरही आरोग्य विभागाची करडी नजर आहे.


संबंधित बातम्या :


नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह


#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती

Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश


उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश