नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसं फोडा-फोडीचं राजकारण चांगलच तापू लागले आहे. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे तीन नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. घणसोली येथील शिवसेनेच्या तीन नगरसेवच्या भाजपच्या वाटेवर आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या सर्व राजकीय घडामोडींमुळे नवी मुंबई महापालिकेतील आपल्या नगरसेवकांना पक्षांतर करण्यासाठी रोखण्याचं मोठं आव्हान सर्व पक्षांसमोर असणार आहे.


नवी मुंबईच्या घणसोली येथील शिवसेनेचे एकाच कुटुंबातील तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. या नगरसेवकांमध्ये नगरसेविका कमलताई पाटील, प्रशांत पाटील आणि सुवर्णा पाटील यांचा समावेश आहे. गणेश नाईक यांच्या पोस्टरवर झळकले आहेत. घणसोली परिसरात महानगरपालिकेने सेंट्रल पार्क बांधलं आहे. या सेंट्रल पार्कचा लोकार्पण सोहळा गुरुवारी होणार आहे. या कार्यक्रमाचे पोस्टर्स शहरभर लावले आहेत, त्या पोस्टर्सवर या तीनही नगरसेवकांचे फोटो झळकले आहेत.


भाजपच्या गणेश नाईकांना धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश


तुर्भे येथील ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी या चार नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत होणार आहे. गेली अनेक वर्ष महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या गणेश नाईक यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात केले जात आहेत.


NMMC Election | नवी मुंबई महापालिकेत भाजप-मनसे युतीची शक्यता