मुंबई : जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाचे संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी भिवंडीत कोरोनाचा संशयीत रुग्ण आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णास कोरोनाच्या संशयावरून पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
भिवंडीतील 60 वर्षीय महिला मागील आठवड्यात नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी पुण्यात गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती भिवंडीत आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी गेल्या होत्या. मात्र प्रकृतीत फरक पडत नसल्याने बुधवारी त्या भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर महिलेमध्ये कोरोना सदृश लक्षणं दिसून आली.
महिलेमध्ये आढळून आलेली लक्षणं कोरोनाच्या लक्षणांशी मिळतीजुळती असल्यामुळे डॉक्टरांनी या महिलेला सतर्कता आणि पुढील उपचारासाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविले असल्याची माहिती इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा संशयीत रुग्ण भिवंडीसारख्या कामगार नगरीत आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरणं पसरलं आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus Update | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 60 वर
दरम्यान सदर महिलेस खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महिलेचा कोरोना संदर्भातील रक्त तपासणी अहवाल उद्या येणार आहे. रक्त तपासणी अहवालावरूनच खरे काय ते समजणार आहे. मात्र सध्या भिवंडीतील नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये, तसेच प्रत्येक नागरिकाने खबरदारीचा उपाय म्हणून दैनंदिन जीवनात काम करताना आणि घराबाहेर पडताना याबाबत खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
काय आहे कोरोना व्हायरस?
डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संबंध थेट सी-फूडशी आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत. कारण या विषाणुंचा एक समूह थेट रूग्णांच्या शरीरावर इफेक्ट करत आहे. हा व्हायरस उंट, मांजर तसेच वटवाघुळ यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्षांमध्ये पसरत आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus Effect | पुण्यात 5 कोरोनाग्रस्त; कात्रज, धायरी, नांदेड सिटीतल्या तीन शाळा बंद
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह
#CoronaVirus देशात कोरोना व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण, आरोग्य मंत्रालयाची माहिती
Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश
उत्तर कोरियात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, किम जोंग यांचे गोळ्या घालण्याचे आदेश