मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार राज्यातल्या बेरोजगारांना दिलासा देणार आहे. तशी तयारी महाविकास आघाडी सरकार करत आहे. राज्य सरकारच्या सेवेच्या अंतर्गत येणारी 72 हजार पदं लवकरात लवकर भरण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यामुळे महाराष्ट्रातल्या तरूणांना याचा मोठा फायदा होणार आहे . 2014 ते 2019 या काळात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता असा आरोप विरोधी पक्षात असताना हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं केले होतो पण सत्तेत आल्यानंतर बेरोजगारांना मोठा दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याचं दिसतं आहे.


शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्त्या होत असल्याबाबत जोगेंद्र कवाडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान शिक्षक सदस्य विक्रम काळे यांनी जाहिरात देण्यात आलेल्या 72 हजार पदांसंदर्भात उपप्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भरणे यांनी सांगितलं, मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मात्र न्यायालयात लवकरात लवकर भक्कमपणे बाजू सरकार मांडेल असं त्यांनी सांगितलं. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

2016 मध्ये सहा लाख 96 हजार पदं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 2019 पर्यंत 5 लाख 65 पदं भरण्यात आली. त्यानंतर मंजूर झालेल्या 7 लाख 35 हजार पदांपैकी 5 लाख 85 हजार पदांची भरती झाली अशी माहिती भरणे यांनी दिली.

या पदांसाठी होणार भरती
कृषी विभाग
कृषी सेवा वर्ग 1, 2, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक

पशुसंवर्धन
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, पशुधन पर्यवेक्षक

दुग्धविका
अभियांत्रिकी गट (कनिष्ठ), दुग्धविकास-अभियांत्रिकी गट, दुग्धसंवर्धन, प्रारण, दुग्धशाळा आणि कृषी पर्यवेक्षक, दुग्धसंकलन विकास अधिकारी आणि तंत्रज्ञ

मत्सव्यवसाय
सहायक आयुक्त, मत्सव्यवसाय विकास अधिकारी, सहा. मत्सव्यवसाय विकास अधिकारी

ग्राम विकास विभाग
आयुर्वेदिक वैद्य, वैद्यकीय अधिकारी-वर्ग 3, अवैद्यकीय पर्यवेक्षक, युनानी हकीम, कृषी अधिकारी, कनिष्ठ अभियंता विस्तार अधिकारी श्रेणी - 2, विस्तार अधिकारी श्रेणी - 3, साथरोग वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषी), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, सहा.पशुधन विभाग अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा सहायक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता, जिल्हा सार्व.परिचारिका, विस्तार अधिकारी (आयु), प्रशिक्षित दाई, विकास सेवा गट-क, गट-ड,
सार्वजनिक आरोग्य विभाग
वैद्यकीय अधिकारी गट अ, गट ब (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट क (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे), गट ड (वैद्यकीय सेवेशी प्रत्यक्ष संबंधित असलेली पदे),

गृह विभाग
पोलीस उप अधीक्षक, वरिष्ठ गुप्त वार्ता अधिकरी,सहायक गुप्ता वार्ता अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई,

सार्वजनिक बांधकाम
सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

मृद व जलसंधारण विभाग
सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य),कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

वित्त विभाग
सहायक संचालक,कनिष्ठ लेखापाल

Ajit Pawar | पोलीस दलातील 8 हजार पद भरणार : अजित पवार | ABP Majha