मूळचा चंद्रपूरचा असणारा हा 24 वर्षीय तरुण ईटलीमध्ये शिक्षण घेत असून तो काही दिवसांपूर्वी भारतात परतला. यावेळी मुंबई विमानतळावर त्याची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली होती. पण त्यावेळी तो निरोगी असल्याचं स्पष्ट झाल होतं. तीन दिवसांपूर्वी नाशिकला तो त्याच्या बहिणीकडे आला असता त्याला सर्दी आणि घसादुखीचा त्रास जाणवू लागताच कोरोनाच्या संशयावरून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तज्ञ डॉक्टरांनी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते पुण्याला पाठवण्यात आले आहेत. लवकरच अहवाल प्राप्त होताच त्यानूसार उपचाराची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित क्षेत्रातून आठ नागरिक दाखल झाले आहेत.
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्याई व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत ?
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.
संबंधित बातम्या