एक्स्प्लोर

Lockdown | ट्रान्सपोर्ट सुरु करा, पुरवठा पूर्ववत न केल्यास वैद्यकीय वस्तूंचा तुटवडा कायम : वितरक

सध्या मुंबईतील वितरकांकडे औषधं, हॅण्ड ग्लोव्ज तसंच इतर वस्तू संपत चाललेले आहेत. त्यामुळे यांचा पुरवठा पूर्ववत केला नाही, तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात पुन्हा नवीन संकट निर्माण होईल होण्याची शक्यता निर्माण झालली आहे.

मुंबई : देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अडचणी निर्माण होत आहे. सध्या सर्वांच्या गरजेची असणारी औषधे आणि सर्जिकल संबंधित असणाऱ्या गोष्टी मुंबईत कमी प्रमाणात येत असल्यामुळे आणखी आठ दिवसांनी त्यांचाही तुटवडा जाणवणार आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून संपूर्ण राज्यामध्ये औषध, हॅण्ड ग्लोव्ज, पीपी किट यांची मागणी वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये होलसेल विक्रेत्यांकडे जेवढा साठा उपलब्ध होता तो कमी वेळेतच विकला गेलेला आहे. आता नवीन वस्तू पुन्हा मुंबईत मागवायचा झाल्या, तर त्या विविध राज्यांमधून मागवाव्यात लागत आहेत. मात्र लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील ट्रान्सपोर्ट कंपनी हा माल वितरकांकडे पोहोचवण्यासाठी तयार होत नाहीत.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टीचा पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. भाजीपाला, दूध, धान्य यांचे वितरण सुरु आहे. तसेच औषधांचे वितरण हे सुरु आहे. मात्र राज्या बाहेर असणाऱ्या विविध फॅक्टरीमध्ये तयार असलेला माल मुंबईत आणण्यासाठी कोणीही तयार नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरातील काही महत्त्वाच्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी देऊन राज्यभरातील फॅक्टरीमध्ये तयार असलेली औषध, हॅण्ड ग्लोज तसेच सर्जिकल संदर्भात असणाऱ्या वस्तू यांचा पुरवठा करुन द्यावा अशी मागणी होत आहे.

मेडिकलशी संबंधित होलसेल व्यापाऱ्यांकडे कंपनीत माल येणं कमी झालं आहे. भविष्यात राज्यात औषधांचा तुटवडा जाणवू शकतो. कारण कंपनीपासून होलसेल दुकानापर्यंत माल आणण्यासाठी ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध नाही. सध्या केवळ मास्क किंवा मेडिकल संदर्भातलं इतर साहित्य मागवायचं असेल, तर पूर्ण ट्रकचं भाडं भरावे लागत आहे. वस्तू केवळ 10,000 असल्या तर त्याचं भाडं वीस ते पंचवीस हजार रुपये होत आहे. त्यामुळे हे भाडं परवडण्यासारखं नाही. माल पोहोचवण्यास संदर्भात आणि भाड्या संदर्भात ट्रान्सपोर्ट कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे.

सध्या मुंबईतील वितरकांकडे वस्तू संपत चाललेले आहेत. त्यामुळे यांचा पुरवठा पूर्ववत केला नाही, तर येत्या आठ दिवसात महाराष्ट्रात पुन्हा नवीन संकट निर्माण होईल होण्याची शक्यता निर्माण झालली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून ही ट्रान्सपोर्ट सुविधा त्वरित सुरु करणं अत्यावश्यक आहे.

प्रतिक्रिया

जिग्नेश दवे (वितरक) औषध, हॅण्ड ग्लोव्ज आणि विविध वस्तूंची मागणी सध्या वाढलेली आहे. या वस्तू वितरकांकडे देखील आता कमी होत आहेत. त्यामुळे राज्यासह राज्याबाहेर असणाऱ्या विविध कारखान्यांमध्ये तयार असलेला माल आता वितरकांकडे पोहोचवणे गरजेचे आहे. मात्र यासाठी ट्रान्सपोर्ट कंपन्या तयार होत नाहीत आणि ज्या कंपन्या तयार होतात त्या मात्र अव्वाच्या सव्वा भाव लावत आहेत. त्यामुळे वितरकांना हे ही परवडत नाही. सरकारने या गोष्टीकडे गंभीर्याने पाहणं गरजेचं आहे. जर देशातील काही ट्रान्सपोर्ट कंपन्यांना परवानगी दिली नाही तर येत्या आठ दिवसांमध्ये विविध राज्यांमध्ये पुन्हा औषधांसह इतर वस्तूंचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारत जाधव ( ट्रान्सपोर्ट व्यवसाय) लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांवर मोठा परिणाम झालाय हे खरं आहे. काही कंपन्यांच्या गाड्या या सरकारकडून वापरल्या जात असून त्यामध्ये भाजीपाला, धान्याची वाहतूक होते. मात्र इतर गोष्टींसाठी ट्रान्सपोर्ट कंपन्यांना गाड्या बाहेर काढणं अडचणीचे ठरत आहे. अशा परिस्थितीत कोणी ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मालक धोका पत्करायला तयार नाहीत. त्यामुळे शासनाने जर फर्मान काढलं तरच ट्रान्सपोर्ट कंपन्या आपली वाहनं रस्त्यावर उतरतील.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

Embed widget