एक्स्प्लोर

खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा शासन निर्धारित दरांनुसार उपयोगात आणण्यात येणार

कोविड बाधित व कोविडची बाधा नसलेल्या रुग्णांसाठीही केंद्रीय पद्धतीने खाटांचे वाटप करून उपयोगात आणण्यात येणार आहेत. यामुळे हृदयविकार किंवा इतर काही आजार असणाऱ्या व्यक्तींना देखील खाटा मिळणार असल्याने त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळू शकणार आहेत.

मुंबई : कोरोनाची बाधा नसलेल्या व असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा शासन निर्धारित अटी व शर्तींनुसार उपयोगात आणण्याबाबत महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली. कोरोना कोविड 19 या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली परिस्थिती ही अपवादात्मक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कोविडची बाधा असलेल्या व कोविडची बाधा नसलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांना अधिकाधिक योग्य पद्धतीने उपचार मिळणे गरजेचे आहे.

याकरिता खाजगी रुग्णालयांमधील खाटांचे नियोजन, वाटप व नियंत्रण हे केंद्रीय पद्धतीने आणि शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. सर्वांना समान पद्धतीने खाटा वाटप व्हाव्यात, याकरिता खाजगी रुग्णालयांमधील 80 टक्के खाटा राज्य शासनाद्वारे निर्धारित करण्यात येणाऱ्या दरांनुसार आणि संबंधित अटी व शर्तीनुसार उपयोगात आणण्याचे राज्य शासनाच्या स्तरावर निश्चित करण्यात येत आहे.

या खाटा सध्या निश्चित करण्यात आलेल्या प्रमाणात कोविड बाधित व कोविडची बाधा नसलेल्या रुग्णांसाठीही केंद्रीय पद्धतीने वाटप करून उपयोगात आणण्यात येणार आहेत. यामुळे हृदयविकार किंवा इतर काही आजार असणाऱ्या व्यक्तींना देखील खाटा मिळणार असल्याने त्यांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळू शकणार आहेत. तसेच या खाटा फक्त कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचा कयास काही ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे, तो चुकीचा व निराधार आहे, असेही आजच्या बैठकीदरम्यान नमूद करण्यात आले.

सर्व खासगी रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 80 टक्के खाटा या शासन निर्धारित दरांनुसार उपयोगात आणण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या खाटांचे सध्याच्या प्रमाणानुसार कोविडची बाधा असलेल्या रुग्णांना व कोविड नसलेल्या रुग्णांना केंद्रीय पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. यानुसार शासनस्तरावर दरपत्रक आणि संबंधित अटी व शर्ती निर्धारित करण्यात येत आहेत.

संबंधित बातम्या

CM Thackeray Lockdown 4 | लॉकडाऊन उठवून महाराष्ट्राला धोक्यात टाकणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

Dadar Metro Name : 'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
Sanjay Raut: द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
द्रौपदीच्या वस्त्रहरणावेळी कौरवांच्या चेहऱ्यावर जे हास्य, तेच विकट हास्य शायन एनसींच्या चेहऱ्यावर; संजय राऊतांचा हल्लाबोल, आंदोलनावरही ठाम!
Shaina NC apology: अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
Embed widget