मुंबई : कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार असल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी येणार असून अधिवेशनाचा समारोप देखील शनिवारी होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या लोकं धास्तावले आहेत. अर्थात यामध्ये जास्त घाबरण्यासारखं काही नाही, असं प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दी होणारे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेलं विधीमंडळाचं अधिवेशन देखील आटोपतं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  हे अधिवेशन 20 मार्चपर्यंत चालणार होते,मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता अधिवेशनाचा समारोप शनिवार, 14 मार्च रोजी होणार आहे.


#CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द

कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात एन्ट्री केल्याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर आता सरकार, प्रशासनासह नागरिक देखील दक्ष झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण सात रुग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील पाच पुण्यातील तर दोन रुग्ण हे मुंबईतील असल्याची माहिती आहे.  कोरोनाच्या धसक्याने राज्यातील अनेक देवाधिकांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनावर देखील कोरोना इफेक्ट झाला आहे.

Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा

आज कोरोनाच्या भीतीने विधिमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी करण्यात आली. आज विधिमंडळात एक दिवसाच्या पासेसवर बंदीचे निर्देश देण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही पासेसचे वाटप न करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या.  राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत सध्या तरी बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली होती.मात्र अखेर बैठकीत अधिवेशन गुंडाळण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Coronavirus | पुण्यानंतर मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रूग्ण; राज्यात एकूण 7 कोरोनाग्रस्त


चॉकलेट ऐवजी सॅनिटायझर
आज विधीमंडळात अनेक मंत्री, आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक हे चक्क सॅनिटायझर घेऊन फिरत होते. विधी मंडळात कोणी चॉकलेट देत होते, तर कोणी वेलची, पण आज लोक एकमेकांना सॅनिटायझर देत असल्याचे चित्र होते. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी तर विधी मंडळाच्या पायऱ्यांवर पत्रकारांच्या हातावर. "तुम्ही सगळ्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, तुम्ही पण हात मिळवताना काळजी घेतली पाहिजे" असं म्हणत सॅनिटायझर वाटप केलं.

Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल 

विधिमंडळात एकदिवसीय न पास देण्याचा निर्णय
विधी मंडळात सध्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कामासाठी येतात. शाळेतील मुलं, विद्यार्थी, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक विधानभवनात कामकाज पाहायला येतात. विधिमंडळात खूप गर्दी असते त्याबाबत आमदारांनी पण प्रश्न उपस्थित केले होते. ही गर्दी टाळावी म्हणून एकदिवसीय पास न देण्याचा निर्णय पण झाला आहे. बाहेरून एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती विधी मंडळात आली तर इथं अनेक आमदार, मंत्री अनेकजण येतात. इथं मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ शकतो, अशीच चर्चा सगळ्यांमध्ये रंगली होती. या सगळ्यात कोणीतरी मास्क घालून फिरताना पण दिसत होतं. एकूणच कोरोनाचे सावट आज दिवसभर विधी मंडळावर होते.