मुंबई : सध्या चीनसह जगभरात करोना व्हायरसने थैमान घातला असून सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या एका महिलेची पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्या महिलेने आपले अनुभव शेअर केले आहे.


एलिझाबेथ स्नायडर असे या महिलेचे नाव आहे. ही महिला सिएटल मधील आहे.  फेसबुक पोस्टमध्ये कोरोनाची लागण झाल्यावर कोणती लक्षणे दिसली तसेच चाचण्या कशा प्रकारे केल्या या विषयी माहिती दिली आहे.  फेसबुक पोस्टमध्ये  एलिझाबेथ म्हणाली आहे की, आजारपण टाळण्याासाठी लवकर वैद्यकीय चाचण्या केल्यास किंवा  योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच बरा होऊ शकतो. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांकडे जाण्याचे आावाहन देखील  केले आहे.



कोरोनातून आपण आता बरे झालो आहोत आणि आपली नियमित कामे सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. या फेसबुक पोस्टला जवळपास 21000 लोकांनी शेअर केले असून, त्यावर तीन हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे विनाकारण घाबरून जाण्याचे कारण नाही. वेळेत निदान होणे आणि आवश्यक औषधांसह विश्रांती घेतल्यामुळे कोरोनातून बरे होऊ शकतो, असे एलिझाबेथने म्हटले आहे.
कोरोना व्हायरस म्हणजे काय?


कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.


कोरोनाची लक्षणे कोणती आहेत ?


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.


कोरोनाबाबत काय काळजी घ्याल?


तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.


 

Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण



संबंधित बातम्या : 

#Coronavirus | पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संशयित महिला आढळली, महिलेसह आठ जण रुग्णालयात दाखल

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, मुंबईत एकही रुग्ण आढळलेला नाही : राजेश टोपे