एक्स्प्लोर

उद्या कोरोना लसीचं मुंबईत आगमन होणार, कशी आहे लसीकरणाची तयारी?

उद्या (13 जानेवारी) पुण्याच्या सीरम इन्स्टि्युटमधून लस मुंबईत येणार आहे.मुंबईत एफ साऊथ वॉर्ड ऑफिसला लसीच्या कोल्डस्टोरेज सेंटरमध्ये लसीचे कंटेनर दीखल होणार आहे.

मुंबई : मुंबईत उद्या लस येणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती. मात्र, या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेल येथील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कशी आहे लसीकरणाची तयारी? मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्डस्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्डस्टोरेजमध्ये एकावेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे 10 लाख लसी साठवता येऊ शकतात. अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे.

देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर अशा 2 लाख लोकांची नावे कोवीन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख लोकांना लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत. त्याप्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे. लस मोठ्या प्रमाणात आल्यास ती कांजूरमार्ग येथे कोल्डस्टोरेजमध्ये साठवली जाईल. मात्र, लस कमी प्रमाणात आल्यास परेल एफ साऊथ येथे लस साठवली जाईल. पहिली येणारी लस परेल येथे साठवण्याची तयारी आहे.

5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग मुंबई महानगरपालिकेने 275 मास्टर ट्रेनर तयार केले आहेत. त्यांच्या माध्यमातून 2500 कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. 5 कर्मचाऱ्यांची एक टीम या प्रमाणे 500 टीम तयार करण्यात आल्या आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात करता यावे म्हणून आणखी 10 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. त्यापैकी 5 हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे असे काकाणी यांनी सांगितले.

सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण करता यावे यासाठी येत्या काही महिन्यात शाळांमध्ये आणि विभागातील सभागृहे ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस पालिकेच्या केईएम, सायन,नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी 9 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 72 बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक 5 बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान 100 जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान 14 हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे

कांजूरच्या कोल्डस्टोरेजचे काम अपूर्ण पालिकेने लस साठविण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्राची निवड मध्यवर्ती लस साठवणूक केंद्रासाठी केली असली तरी या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार आहे

पंतप्रधान साधणार संवाद येत्या 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालिकेच्या कूपर रुग्णालयातील लाभार्थी आणि लस देणारे डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. कोवीन अॅपमध्ये आलेल्या अडचणी यावेळी पंतप्रधान जाणून घेणार आहेत. यासाठी पालिका प्रशासनाला टू वे व्हिडिओ कॉन्फरन्सिगची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget