नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) काम मागील बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. अद्याप विमानतळाचे काम पूर्ण झालेले नाही. दरम्यान या विमानतळाच्या नामकरणावरुनही वाद सुरु असून तेथील स्थानिकांनी दिवंगत सामाजिक कार्यकर्ते आणि माजी खासदार दि.बा.पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे. तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावं असा आग्रह आहे. यावरुन मागील बराच काळ वाद सुरु असून आता पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त अर्थात स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक आक्रमक झाले आहेत. शांततेच्या मार्गाने आम्ही अनेक आंदोलने केली मात्र सिडको आणि राज्य सरकारने भूमीपुत्राच्या या आग्रही मागणीकडे कानाडोळा केला होता. त्यामुळे आता सिडको व राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्या आक्रमकपणे मांडण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्थानीं केला आहे. येत्या 13 जानेवारी रोजी 27 गावं प्रकल्पग्रस्थ कृती समितीच्या नेतृत्वाखाली भूमीपुत्र निर्धार परिषदेच आयोजन करण्यात आले असून येत्या 24 तारखेपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्थानीं आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यामुळे आता प्रकल्पग्रस्थ विरुद्ध राज्य सरकार असा थेट वाद रंगणार आहे हे नक्की.
महत्वाच्या बातम्या
- Mumbai Corona : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास शिवसैनिकांकडूनच हरताळ; मालवणी जत्रोत्सवात तुफान गर्दी, कोरोना नियमांची ऐशीतैशी
- Video : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डान्स स्पर्धेत कोरोना नियमांचा फज्जा, व्हिडीओ व्हायरल
- उल्हासनगरात पोलिसांकडून अरेरावी, अंगावर घातली बुलेट, दिसेल त्याला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
- पहिल्याच दिवशी CoWIN वर अडीच लाखांहून अधिक मुलांची नोंदणी, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटासाठी लसीकरणाला सुरुवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha