एक्स्प्लोर
काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक, 2019 च्या आघाडीसाठी बोलणी
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई : 2019 मधील निवडणुकांच्या तयारीसाठी मुंबईत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्व आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत काही निर्णय होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित राहाणार आहेत.
त्यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक दादरच्या टिळक भवनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
शिवसेनेनं यापुढच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित ताकद लावण्याची तयारी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement