एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला बीएमसीकडून डिफॉल्टर घोषित, साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याला मुंबई महानगरपालिकेनं डिफॉलटर घोषित केलं आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागावली होती. त्यात ही माहिती उजेडात आली आहे.
मुंबई : पाण्याचं बिल थकल्यास मुंबई महानगरपालिका सामन्य मुंबईकरांवर कडक कारवाई करते. अनेकदा पाणीही बंद केलं जातं. मात्र महापालिकेकडून मुख्यमंत्री आणि इतर नेतेमंडळींच्या वेगळा न्याय दिला जात असल्याचं दिसून आलं आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर नेते मंडळींच्या शासकीय निवसस्थानांचं लाखो रुपयांचं पाणी बिल थकलं असल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपयांची पाणी बिल थकलं आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांचं एकूण 8 कोटी रुपये पाणी बिल थकलं आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर एवढी मेहरबान का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या बंगल्याला मुंबई महानगरपालिकेनं डिफॉलटर घोषित केलं आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागावली होती. त्यात ही माहिती उजेडात आली आहे.
मंत्र्यांच्या निवासस्थानांची पाणी बिल थकबाकी
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, वर्षा निवासस्थान
एकूण थकबाकी - 7 लाख 44 हजार 981 रुपये
सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री, देवगिरी निवासस्थान
एकूण थकबाकी -1 लाख 45 हजार 055 रुपये
विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री, सेवासदन निवासस्थान
एकूण थकबाकी - 1 लाख 61 हजार 719 रुपये
पंकजा मुंडे, महिला व बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थान
एकूण थकबाकी - 35 हजार 033 रुपये
दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थान
एकूण थकबाकी - 1लाख 05हजार 484 रुपये
सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थान
एकूण थकबाकी - 2 लाख 49 हजार 243 रुपये
एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन
एकूण थकबाकी - 2 लाख 28 हजार 424 रुपये
चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री, जेतवन
एकूण थकबाकी - 6 लाख 14 हजार 854 रुपये
महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी
एकूण थकबाकी - 1 लाख 73 हजार 497 रुपये
ज्ञानेश्वरी निवासस्थान
एकूण थकबाकी - 59 रुपये 778 रुपये
सह्याद्री अतिथीगृह
एकूण थकबाकी -12 लाख 04 हजार 390 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्राईम
करमणूक
राजकारण
Advertisement