एक्स्प्लोर
Advertisement
हेवाळेकर दाम्पत्याच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती
मुंबई : जातपंचांच्या जाचाविरोधात दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या दारात गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन ठाण मांडलेल्या हेवाळकर दाम्पत्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वर्षा'वर बोलावून घेतलं. इतकंच नाही तर 'वर्षा'वर प्रतिष्ठापना केलेल्या बाप्पाची हेवाळकर कुटुंबीयांच्या हस्ते पूजा आणि आरती झाली.
याशिवाय जातपंचायत प्रकरणात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालावं, असा आदेश मुख्यमंत्र्यानी दिला आहे.
गणेशोत्सवादरम्यान हेवाळेकर कुटुंब गावी गेलं असताना जातपंचानी त्यांना गावात येण्यास नकार दिला. त्यामुळे या दाम्पत्याने गणपती बाप्पांची मूर्ती घेऊनच काल रात्री (बुधवारी) मंत्रालयाच्या दारावर ठाण मांडलं होतं.
जातपंचायतीचा बहिष्कार, गणेशमूर्तीसह दाम्पत्य मुख्यमंत्र्यांकडे
कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे या गावात हेवाळेकर दाम्पत्य राहतं. या दाम्पत्याला 2006 पासून गावातील जातपंचांनी वाळीत टाकलं आहे. गावातील रुढी पंरपरांना विरोध केल्यामुळे हा प्रकार घडला. मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांची या दाम्पत्याने भेट घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे दम्पत्याने बाप्पाच्या मूर्तीसह थेट मंत्रालय गाठलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement